Book Title: Chamatkar Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय लोकांच्या मान्यतांचा प्रवाह उलट्या दिशेत ओढून नेणारे प्रबळ परिबळ या काळात ठिकठिकाणी पसरतच राहिले आहे, आणि ते आहे चमत्काराविषयी त-हेत-हेच्या अंधश्रद्धांना जन्म देणाऱ्या जाहिराती! ज्या देशाची प्रजा चमत्कारांना मानते, त्यातच रमलेली असते आणि त्याची पूजा करत असेल, अशा देशाच्या आध्यात्माचे पतन कुठे जाऊन थांबेल त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. चमत्कार कशास म्हणावा? बुद्धिने समजू शकणार नाही अशी बाहेरची क्रिया होणे म्हणजे चमत्कार? पण त्यात बुद्धिच्या समजुतीची सापेक्षता माणसा-माणसात वेगवेगळी असते. एकाच्या बुद्धित सामावली जात नाही, तर दुसऱ्याच्या बुद्धित सामावली जाते. बुद्धिची सीमा सुद्धा प्रत्येकाची वेगळी-वेगळीच आहे ना! या काळात चमत्काराच्या भ्रांत मान्यतांना मूळासकट उपटून टाकणारे परम कृपाळु 'दादाश्री' नेहमी सांगत असत की, चमत्काराची यथार्थ डेफिनेशन (व्याख्या) तर समजली पाहिजे ना? पण चमत्कार कशास म्हणता येईल ही 'डेफिनेशन' या जगात तयार झालेली नाही. म्हणून याची डेफिनेशन नाही असे नाही. याची डेफिनेशन देण्यासाठी मी तयार आहे. चमत्कार त्यास म्हणतात की ज्यास दुसरा कोणी करूच शकत नाही. आणि सिद्धी त्यास म्हणतात की, त्यांच्या मागून येणारा दुसरा कोणी करू शकतो. अत्याधुनिक काळात जिथे बुद्धी वैज्ञानिक क्षेत्रात नव-नवीन आश्चर्यांची परंपरा सर्जन करण्यात विकसित झालेली आहे, अशा वेळी भारतातील लोकं बुद्धिचे दरवाजे बंद करून भ्रांत श्रद्धेतच बुडून राहतील, ते परवडणार नाही. कित्येक विज्ञानाच्या सिद्धी असतात, त्या जोपर्यंत जाहीर झालेल्या नाहीत तोपर्यंत चमत्कारात मानल्या जातात. पण पब्लिकमध्ये प्रकट झाल्यानंतर त्यास चमत्कार म्हटले जात नाही. आजपासून शंभर वर्षांपूर्वी चंद्रावर चमत्काराचा दावा करून पदार्पण करणाऱ्याला चमत्कारिक पुरुष किंवा साक्षात् परमात्मा म्हणून लोक त्यांचे कौतुक करीत! आणि आज?!Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72