________________
चमत्कार
काही घेतच नाही. तेव्हा हा किती भांडखोर असेल की कोणी त्याची ठेव ठेवण्यासाठी तयार नाही?! त्याचे कारण काय आहे, ते मी तुम्हाला समजावतो. तुम्ही असे म्हणाल की मी कधी कुणाचे पैसे दडपून ठेवले नाही, तरी सुद्धा लोक माझ्याकडे पैसे का ठेवत नाहीत? आणि कित्येक लोकांकडे तर लाखो रुपये जमा ठेवून जातात! हे मी तुम्हाला उदाहरण देत आहे. तुमच्या आतील जे भाव, तुमची श्रद्धा, तुमचे वर्तन अशा प्रकारचे आहे की, तुमच्याकडे कोणी काही ठेव वगैरे ठेवणार नाही. आणि ज्याच्या मनात निरंतर अशी परत देऊन टाकण्याची इच्छा असते, कोणाचे घेण्या अगोदरच परत करण्याची इच्छा असते, निश्चितच असते, आणि वर्तनात सुद्धा असेच असते आणि श्रद्धेत देखील असेच असते, निश्चयातही असेच असते, अशा व्यक्तिकडे लोक आपली ठेव ठेवत असतात! कारण त्याने सिद्धी प्राप्त केली आहे. कोणती सिद्धी प्राप्त केली आहे ? तर सगळ्यांचे पैसे ठरवल्याप्रमाणे परत करून देतो. मागितले की लगेच परत करतो. आणि जो मागितल्यावर सुद्धा परत करत नाही, तर त्याची सिद्धी नष्ट होते. जशी ही पैशांसाठीची सिद्धी आहे, त्याप्रमाणे ह्या दुसऱ्या सर्व निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी उत्पन्न होतात.
सिद्धी म्हणजे स्वतःचे व्यवहार अगदी 'रेग्युलर' ठेवणे आणि अधिक सिद्धी कोणती? तर लोकांनी त्याला जे काही जेवायला दिले असेल त्यातूनही स्वतः कमी खाऊन दुसऱ्यास खाऊ घालत असेल, त्याला अधिक सिद्धी उत्पन्न होतात. आपल्या इथे असे संत होऊन गेले. आता एखादा माणूस कोणालाही शिव्या घालत नसेल, कोणाला दटावत नसेल, कोणाला दु:ख देत नसेल, त्याचे शील इतके सारे असते की त्याला पाहताक्षणीच सर्व आनंदाने नाचू लागतात. त्यासही सिद्धी उत्पन्न झाली असे म्हणतात.
नंतर एखाद्या माणसाने असे ठरवले असेल की मला अमुक प्रकारचे भोजन खायचे नाही. ते खाण्याचे बंद केले असेल, त्यावेळी त्याला सिद्धी उत्पन्न होते. तसेच एखादा माणूस कांदा खात नसेल तर त्याला दूर रस्त्यावर जरी कांदा पडलेला असेल तरी त्याचा वास येतो आणि तुम्हाला तर कांदा जवळच पडलेला असेल तरीही वास येणार नाही. तुम्ही स्वतः कांदा खाल्ला असेल तरीही वास येत नाही. असेच सिद्धीसाठीही असते!