________________
30
चमत्कार
सांगून कारस्थान करतात आणि विनाकारण गोंधळ वाढतात! पण त्यात त्यांचा हेतू चुकीचा नाही, कारण त्यामुळे लोक दर्शन करायला येतात ना! पण आपल्याला याची गरज नाही. आपल्याला त्याचा काय फायदा?
प्रश्नकर्ता : शेजारी मंदिर आहे, तर सगळे सांगतात की दर्शन करण्यास जा. म्हणून आम्ही तर 'दादा भगवानांच्या साक्षीने दर्शन करून आलो.
दादाश्री : त्यास हरकत नाही. आपण मूर्तिचे दर्शन करू शकतो. पण वरुन असे अमृत पडो की दुसरे काही पडो, त्याच्याशी आपल्याला काय देणे-घेणे? आपले क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले की नाही, शांती झाली की नाही, ते बघण्याची गरज आहे.
म्हणून तर कृपाळुदेवांनी सांगितले की, धर्म त्यास म्हणतात की, धर्माच्यारुपात परिणमीत होईल. जर परिणाम दिसत नसेल तर त्यास आपण धर्म कसे म्हणू शकतो? अनंत जन्मांपासून येणे-जाणे केले, धावपळ केली, पण जसे होतो तसेच राहिलो. बाकी क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले, आत मतभेद कमी झाले, शांती वाढली तर आपण समजू की यात काहीतरी भले झाले, कर्म बांधणे थांबले. आणि हे तर नुसते कर्मच बांधले जात आहेत. म्हणून जरी अशी अमृत वर्षा झाली, पण आपल्याला त्याचा काय उपयोग!
कुंकूच्या ऐवजी केशर पाडा ना! म्हणजे अमृत पडू दे की वाटेल ते होऊ दे, पण त्यास आपण 'चुकीचे आहे' असे म्हटले नाही. तसे कित्येक ठिकाणी केशर पडते, कित्येक ठिकाणी कुंकू पडते. केशर तर पडत नाही, पण कुंकू तर पडतेच. केशर थोडे महाग आहे म्हणून नाही पडत. हो, केशराचे शिंतोडे असतात पण असे ढिगभर केशर पडत नाही. आणि केशर पडत असेल तरीही त्यात काय वाईट आहे? आपण थोडे-थोडे घरी आणून काहीतरी बनवून खाऊ!!
आणि मी तर सरळ सांगतो की 'हे देवी-देवता, तुम्हाला माझा नमस्कार आहे पण हे जे तुम्ही शिंतोडे उडवता त्याची मला गरज नाही. तुम्हाला