________________
चमत्कार
कोणाचे दुखणे कोणी घेऊ शकतो? प्रश्नकर्ता : एका संताने एका माणसाचे दुखणे स्वतः घेतले होते. ज्यामुळे नंतर संपूर्ण जीवन त्या संताने अपंग अवस्थेत काढले. त्याविषयी आपले काय मत आहे ?
दादाश्री : कोणाचे दुखणे कोणी घेऊ शकत नाही, असे आम्ही मानतो. आणि त्यांची चूक होत असेल तर त्यांनाच नुकसान करेल ना? तुम्हाला काही नुकसान करणार नाही. म्हणजे असे कोणी करू शकत नाही. म्हणून ही शंका मनातून काढून टाका, असे सर्व!
आपल्या हिंदुस्तानचे संत आहेत, ते समोरच्याच्या शरीरामधून रोग सुद्धा स्वत:च्या अंगावर घेतात(!) असे पुस्तकात उघडपणे लिहिलेले असते. अरे, ह्या हिंदुस्तानचे बुद्धिवंत, तुम्हाला हेही समजत नाही की त्यांना शौचाला जाण्याची शक्ति नाही, मग तो ते कसे काय अंगावर घेणार होता? आणि ते तर निमित्त असतात. निमित्त म्हणजे काय, की कर्माचे उदय असे आहेत म्हणून त्यांच्या निमित्ताने परिवर्तन घडून येते. परंतु त्याचा रोग आम्ही घेऊन टाकतो, असे घेतो, असे त्याचे आयुष्य वाढवतो,' अशा ज्या सर्व गोष्टी करतात ना, ते डोक्यात किडे पडतील अशा गोष्टी करतात!! ।
प्रश्नकर्ता : ज्या संताच्या सांगण्याने समोरच्या व्यक्तिचे दुखणे निघून जाते, असे जे घडते त्याचे कारण म्हणजे त्या संताचे यशनाम कर्म असेल, असेच ना?
दादाश्री : असे सर्व होऊ शकते. त्या व्यक्तिचा रोगही बरा होतो. असे संताचे निमित्त असते. म्हणजे यशनाम कर्म असते. पण हे 'दुखणे अंगावर घेतात' हे जे सांगतात ना, ते खोटे आहे. तो जर असे सांगत असेल तर आपण विचारावे की, 'साहेब, मग तुम्हाला हे एवढे सारे रोग कशामुळे आहेत?' तेव्हा म्हणेल, 'दुसऱ्यांचे रोग अंगावर घेतले म्हणून!' पाहा, चांगला पुरावा सापडला ना! आता त्या संताला मी विचारेन की, 'अरे साहेब, तुम्हाला शौचाला जाण्याची शक्ति आहे का? असेल तर मला सांगा.' तुम्ही कसे काय दुःख घेणार आहात? मोठे आले दुःख घेणारे, शौचाला जाण्याची तर शक्ति नाही! अरे, माझ्या बाबतीतही लोक असे म्हणत होते ना! तीन