________________
चमत्कार
तेव्हा दुसऱ्यांना त्याचे खूप आश्चर्य वाटते, त्यास सिद्धी वापरली म्हणतात. पण आता यास चमत्कार म्हणू शकतो का? नाही, कारण जर कोणी दुसऱ्यानेही स्वत:ची सिद्धी वापरली तरी असाच चमत्कार होऊ शकतो, तात्पर्य दुसरा कोणी करू शकतो त्यास चमत्कार म्हटले जात नाही!
शुद्धी तिथे सिद्धी आता सिद्धी म्हणजे, असे आहे ना, की 'ज्ञान' नसले तरीही अनंत, अपार शक्ति आहे. अज्ञानदशेत सुद्धा अहंकार तर आहेच ना! पण तो अहंकार शुद्ध करतो, स्वतः स्वतःसाठी काहीच वापरत नाही, स्वत:च्या वाट्यास जे आले असेल ते सुद्धा दुसऱ्याला देतो आणि स्वतः काटकसरीने राहतो, त्यामुळे त्याला खूप सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे संयमाच्या प्रमाणात सिद्धी उत्पन्न होत असतात. पण तरी आत्मज्ञानाशिवाय खरी सिद्धी तर नसतेच. ह्या लोकांना तर हृदयशुद्धीचीच सिद्धी असते. आता 'ज्ञान' नसेल पण फक्त हृदयशुद्धीच असेल, हिंदुस्तानाच्या लोकांना 'ज्ञान' (आत्मज्ञान) तर नाहीच. पण हृदयशुद्धी असते ना, त्यामुळे तो चोख (निर्मळ मनाचा) असतो, एक पैसा पण चुकीच्या मार्गाने घेत नाही, पैसे वाया घालवत नाही, जिथे पैशांचा अजिबात दुरुपयोग होत नाही, लोकांचे पैसे लुबाडत नाही, स्वतःच्या अहंकाराचा रुबाब दाखवत नाही, तसेच मी त्याला असे करून दिले व त्याचे तसे करून दिले अशी बढाई मारत नाही, तर अशा लोकांना हृदयशुद्धिची सिद्धी असते, ती खूप चांगली म्हटली जाते, पण तिथे 'ज्ञान' नसते.
सिद्धीची 'सिमिली' सिद्धीचा अर्थ तुम्हाला समजावतो, ते तुम्ही तुमच्या भाषेत समजू शकाल म्हणून. तुम्ही कोणत्या बाजारात व्यापार करता?
प्रश्नकर्ता : लोखंड बाजारात.
दादाश्री : आता त्या लोखंड बाजारात तो मनुष्य इतका आबरुदार मानला जातो की, 'भाऊ, नूर महंमद शेठची तर गोष्टच निराळी, मानावे लागेल त्या शेठला!' प्रत्येक व्यापारी असेच सांगेल आणि पाच लाख रुपये