________________
चमत्कार
दादाश्री : तो चमत्कार नाही. कारण तुमची बुद्धी मर्यादित असेल तेथे लोक काय करतील? लोक कसे 'एक्सेप्ट' (स्वीकार) करतील? तुम्ही त्यास चमत्कार म्हणाल, पण जास्त बुद्धिवंत असेल, तो कसा स्वीकार करेल?
म्हणजे चमत्काराची व्याख्या जर तुम्ही समजाल, तर चमत्काराची व्याख्या जगात कोणीही दिलेली नाही. पण मी देण्यास तयार आहे. चमत्कार त्यास म्हणतात की दुसरा कोणी ते करूच शकत नाही, तो आहे चमत्कार!
होत नाही नक्कल चमत्काराची प्रश्नकर्ता : हो. पण त्यालाच वेगवेगळे नाव दिले, की यास सिद्धी म्हणतात, हे अमके म्हणतात, त्यालाच माणसं चमत्कार म्हणतात ना?
दादाश्री : सिद्धी त्यास म्हणतात की जो दुसरा, म्हणजे त्याच्या मागचा करू शकेल. पण चमत्कार तर त्यास म्हणतात की जे दुसरा कोणीही करू शकत नाही.
प्रश्नकर्ता : आपण चमत्काराची जी डेफिनेशन दिली, अशी डेफिनेशन तर जगात कुठेच मिळणार नाही!
दादाश्री : अशी असणारच नाही ना! अशी डेफिनेशन नसल्यामुळे तर लोक चमत्काराचे गुलाम झालेत! चमत्काराचे शेठ बनायचे तेथे चमत्काराचे गुलाम झालेत!
म्हणजे दुसरा कोणी करू शकतच नाही, त्यास चमत्कार म्हटले जाते. कारण सिद्धी नेहमी उत्पन्न होतच राहते मग तो जेव्हा सिद्धीचा वापर करतो तेव्हा कमी सिद्धी असलेला त्यास चमत्कार म्हणतो. आणि जास्त सिद्धी असणाऱ्यांना त्याची दया येत असते की हा तर सिद्धीचा दुरुपयोग करीत आहे! तुम्हाला समजते का माझे म्हणजे?
प्रश्नकर्ता : हो, हो.
दादाश्री : सिद्धी वापरली म्हणजे काय, तर तुम्ही साधना करतकरत जी काही शक्ति प्राप्त करता, ती शक्ति तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता,