________________
चमत्कार
प्रश्नकर्ता : सिद्धी उत्पन्न होते आणि ती वापरायची नाही, तर मग त्याचा अर्थच काय?
दादाश्री : जो वापरतो त्याच्यावर जबाबदारी येते. ती सिद्धी तर आपोआपच वापरली जाते, आपण वापरायची नाही.
प्रश्नकर्ता : जर सिद्धीचा उपयोग होणार नसेल तर मग ती सिद्धीचा काय उपयोग?
दादाश्री : असे आहे, सिद्धी म्हणजे सिद्ध होण्याचे अंश ! ते अंश आपण सिद्ध होण्यापूर्वीच वापरुन टाकले तर सिद्ध होऊ शकतो का?! बाकी, मनुष्य जसजसा उंच पातळीवर जातो ना, तसतशी सिद्धी उत्पन्न होते. आता त्या सिद्धीचा जर दुरुपयोग झाला तर सिद्धी नष्ट होऊन जाते.
नाही चमत्कार जगात कुठेही? म्हणजे हे तर सिद्धीचा उपयोग करतात, त्यास आपले लोक 'चमत्कार' म्हणतात. तर मग दुसरा कोणी सिद्धी वापरेल त्यालाही चमत्कार म्हटले जाईल. पण ते चमत्कार म्हटले जात नाहीत. चमत्कार म्हणजे, जे दुसरे कोणीही करू शकत नाही, त्याचे नाव चमत्कार. दुसरा करतो म्हणजे त्याचा अर्थ एवढाच की तुम्ही सुद्धा जेव्हा त्या 'डिग्री' वर पोहोचाल तेव्हा तुम्ही तुमची सिद्धी वापराल, तर त्यास देखील असाच चमत्कार मानला जाईल आणि जो सिद्धी वापरत नाही त्याच्याजवळ चमत्कार नाही का?!
माझ्या बरोबरीचा बसला असेल तर तो माझ्यासारखेच सर्वकाही करणार की नाही करणार? असे अवश्य होईल. म्हणून ते चमत्कार म्हटले जात नाहीत. ते तर बाय प्रॉडक्ट आहे सिद्धीचे! माझी इच्छा नाही की असे चमत्कार करू, पण तरी देखील एवढे 'बाय प्रॉडक्ट' आहे, म्हणजे यशनाम कर्म आहे त्यामुळे हे प्राप्त होते!
अर्थात् दुसरा कोणी करू शकत नाही, त्यास म्हणतात चमत्कार ! ही डेफिनेशन तुम्हाला आवडली तर स्वीकारा, नाहीतर ही डेफिनेशन आमची स्वतंत्र आहे. कोणत्या पुस्तकात लिहिलेली सांगत नाही!