________________
चमत्कार
27
तो नाही माझा चमत्कार एकदा पालीताणा येथे भगवंतांच्या मंदिरात मोठ्याने त्रिमंत्र बोलवून घेतले. त्रिमंत्र मी स्वतः बोललो आणि त्यानंतर तांदूळ आणि असे सर्व पडले. तेव्हा लोक म्हणाले, 'अरे..... चमत्कार झाला.' मी म्हणालो. 'हा चमत्कार नाहीच. त्यामागे करामती आहेत.'
प्रश्नकर्ता : कोणाच्या करामती आहेत?
दादाश्री : देवी-देवता सुद्धा यात थोडी काळजी घेतात. लोकांचे मन जेव्हा धर्मापासून विमुख होते ना, तेव्हा देवी-देवता असे काही करून लोकांना धर्माकडे वळवतात, श्रद्धा बसवून देतात. आता असे कधीतरीच घडते, आणि जे शंभरवेळा घडते त्यात नव्याण्णव वेळी तर एक्जेगरेशन आहेत या लोकांचे. पण त्यांचा हेतू खोटा नाही. म्हणून आपण त्यांना गुन्हेगार मानत नाही. त्यात काय वाईट हेतू आहे ? लोकांना या बाजूने वळवतात ते चांगलेच आहे ना!
आता तिथे तांदूळ पडले तेव्हा एका माणसाच्या डोक्यावर तांदूळ पडले नाहीत. म्हणून तो मला म्हणला की, आज सकाळी मी तुमचे सांगितलेले ऐकले नाही, त्याचे हे मला फळ मिळाले.' आता हेही खोटे होते आणि तो चमत्कार केला तेही खोटे होते. मी असे काही केलेच नव्हते.
प्रश्नकर्ता : मंदिरात जेव्हा दादा त्रिमंत्र बोलले तेव्हाच तांदूळ पडले, असे का झाले?
दादाश्री : ते निमित्त असे बनते ना! मी पाहतो ना, तेव्हा ते वरुन टाकतात.
प्रश्नकर्ता : दादा निमित्त तर आहेतच ना?
दादाश्री : ते तर कदाचित आमच्या उपस्थितीने खुष होऊन कधी असे काही पडते, पण त्यात मी काही केले नव्हते!
प्रश्नकर्ता : हा चमत्कार म्हटला जाणार की नाही? दादाश्री : नाही. हा चमत्कार म्हटला जाणार नाही. देवता असे