________________
चमत्कार
घडलेली म्हणजे मी स्वत: बघितलेली नाही पण मी ज्याच्याकडून ऐकली, त्याने सुद्धा दुसऱ्यांकडून ऐकलेली होती, म्हणजे ती प्रत्यक्ष दोन-तीन पिढ्यांपासून पाहत आलेली गोष्ट आहे.
एके वर्षी बडोद्यात दुष्काळ पडला होता. तर तेथील राजाला एका व्यक्तिने जाऊन सांगितले की, 'एक महाराज आले आहेत आणि ते पाऊस पाडू शकतील असे आहेत.' तेव्हा राजा म्हणाले, 'असे होऊच शकत नाही, मनुष्य कसा पाऊस पाडू शकेल?' तेव्हा तो म्हणाला, 'नाही, ते महाराज असे आहेत की ते पाऊस पाडू शकतात!' म्हणून मग राज्यातील मोठ-मोठे शेठ होते ते एकत्र जमले, गावातील सगळे पाटीलही एकत्र जमले आणि सर्वांनी नगरशेठांजवळ ही हकीकत सांगितली. तेव्हा ते सर्व नगरशेठ राजाला म्हणाले की, 'हो, साहेब, त्या महाराजांना बोलवा. नाहीतर दुष्काळाने ही पब्लिक मरुन जाईल.' तेव्हा राजा म्हणाला, 'हो, तर येऊ द्या, त्या महाराजांना!' म्हणून ते सर्व महाराजांकडे पोहचले. तेव्हा मग ते महाराज काय म्हणाले ? 'ऐसे बारीश नही हो जाएगी. हमे गद्दीपर बिठाओ.' तर तो राजा उठून दुसऱ्या ठिकाणी बसला आणि त्या महाराजांना गादीवर बसवले. लालूच आहे ना! राजालाही लालूच उत्पन्न होते तेव्हा काय? सर्वकाही सोपवतो! आता हे महाराज एका बाजूने गादीवर लघवी करतात आणि दुसऱ्या बाजूला बाहेर जोरदार पाऊस पडतो. तात्पर्य, उत्पन्न झालेल्या सिद्धी हे लोक अशा प्रकारे वापरुन टाकतात! म्हणजे ह्या सर्व अज्ञानी लोकांची सिद्धी अशा प्रकारे वापरली जाणार. ते बिचारे सिद्धी कमवतात सुद्धा आणि त्यांच्याकडून ती वापरली पण जाते. 'ज्ञानी' सिद्धींना वापरत नाहीत. भगवंत सुद्धा कधी सिद्धी वापरत नाहीत. नाहीतर महावीर भगवानांनी फक्त एकच सिद्धी वापरली असती ना, तरी जगात उलथापालथ झाली असती.
तीर्थंकरांच्या सिद्धी, मोक्षार्थ भगवान महावीरांच्या दोन शिष्यांना गोशालाने तेजोलेश्या सोडून भस्मीभूत करून टाकले होते. तेव्हा दुसऱ्या शिष्यांनी भगवंतांना सांगितले, विनंती केली की, 'भगवंत आपण तीर्थंकर भगवंत असून, जर आमचे रक्षण