________________
चमत्कार
या चमत्काराचा अर्थ तुम्हाला समजला ना? कोणी म्हणेल, 'मी हा चमत्कार केला' तर तुम्ही काय म्हणाल? की 'हे तर दुसरा कोणी पण करू शकेल, तुमच्या डिग्रीपर्यंत पोहोचलेला मनुष्य करू शकतो, त्यात तुम्ही काय (नवीन) केले?! जी विद्या दुसऱ्याला शिकवल्याने तो करू शकत असेल तर त्याला चमत्कार म्हणू शकत नाही. चमत्कार तर दुसरा कोणीही मनुष्य करूच शकत नाही ! तात्पर्य हेच की दुसरा कोणी करू शकत असेल त्यास चमत्कार म्हटले जात नाही. म्हणून कोणत्याही ठिकाणी चमत्कार मानू नका. कोणी चमत्कारी मनुष्य जगात झालेला नाही!
लपलेली आहे तिथे काही भीक चमत्कार करणारा तर अजून कोणी जन्मलेलाच नाही या जगात! चमत्कार तर कशास म्हटले जाते? जर हा सूर्यनारायणाला इथे असा हातात घेऊन येईल, तर त्यास आपण सर्वात मोठा चमत्कार म्हणू. तेव्हा हे असे इतर सर्व तर चमत्कार मानले जाणारच नाहीत! कदाचित एखादा मनुष्य सूर्यनारायण जरी हातात घेऊन आला, तरी तो चमत्कार म्हटला जाणार नाही. कारण त्याला काहीतरी भूक आहे, तो कशाचा तरी भुकेला आहे! आम्ही तर त्याला विचारु की, तू कशाचा भिकारी आहेस, की ज्यामुळे तू त्यांना (सूर्यनारायणाला) तिथून हलवलेस? ते जिथून प्रकाशमान करीत आहेत, तिथून त्यांना तू कशासाठी हलवित आहेस? त्यांना तिथून इथे आणण्याचे काय कारण? तू कशाचा तरी भिकारी आहेस, म्हणूनच तू त्यांना आणलेस ना? ज्याला काहीतरी इच्छा असेल तोच आणेल ना? कोणती तरी इच्छा असेल, विषयाची इच्छा असेल, मानाची इच्छा असेल, किंवा लक्ष्मीची इच्छा असेल. जर तू लक्ष्मीचा भिकारी आहेस, तर आम्ही तुला सर्व लक्ष्मी गोळा करून देऊ. पण तू आता सूर्यनारायणाला हलवू नकोस. तेव्हा जा आणि त्यांना परत ठेवून दे! काय गरज आहे याची? सूर्यनारायण तिथे आहेत, पण लोकांसमोर देखावा करण्यासाठी तू त्यांना इथे आणलेस? खरा पुरुष तर कोणत्याही वस्तुला हलवित नाही. उलट-सुलट करतात तेव्हा आपण त्याची दानत नाही का ओळखू शकत की त्याची दानत खराब आहे! आणि त्यापासून आपल्याला काय फायदा होतो? आपली एक वेळेचीही भूक मिटत नाही! आता देवलोकांना इथे बोलवून दर्शन घडविले,