Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 52
________________ चमत्कार देखण्याच्या आधारावर मी थोडी श्रद्धा ठेवली असती. तुम्ही असे देखणे नाहीत. जर तुम्ही अशी वाणी बोलणारे असते की तुमची वाणी ऐकून मी खुष झालो असतो, तरीही माझी श्रद्धा बसली असती, किंवा मग तुमचे वर्तन पाहून माझी श्रद्धा बसली असती. पण मला तुमच्यात असे काहीच दिसत नाही. पण तरी मी असे सहज दर्शन करण्यास येईन, तुम्ही त्यागी पुरुष आहात म्हणून. बाकी, मला तुमच्यावर श्रद्धा बसतच नाही!' आता तिथे जर ते चमत्कारीक गोष्ट करायला गेले तर मी जास्त रागवेन, की अशी जादुगिरी कशासाठी करीत आहात? पण हिंदुस्तानचे लोक लालची, म्हणून जिथून चमत्कार पाहून येतात तिथे त्यांची श्रद्धा बसते. त्या चमत्कार करणाऱ्यास आपण सांगावे, 'हिंदुस्तानाच्या लोकांना अन्न-धान्य कमी पडते, तुम्ही अन्न-धान्य गोळा करा. हा चमत्कार करा, तुमच्यात जी शक्ति आहे, ती यात वापरा. पण असे काही ते करत नाहीत! हे तर मूर्ख बनवितात लोकांना! प्रश्नकर्ता : आतापर्यंत असे मूर्ख बनतच आलो आहोत. दादाश्री : पण मग असे जीवन कुठपर्यंत जगावे? लालूच का असावी? माणसाला कशासाठी लालूच असावी? आणि परत तो देणारा कोण? ज्यात शौचाला जाण्याचीही शक्ति नाही, तो काय देणार? फसले विचारवंत सुद्धा... आणि मी चमत्कार केला असे कोण बोलतो? तर ज्याला काहीतरी लाभ उठवायचा आहे, तोच असे बोलतो. आणि कुणाकडून लाभ घ्यायचा आहे ? जे लोक तुमच्याजवळ काही मागत आहेत, त्यांचाच तुम्ही लाभ उठवता? जे लोक स्वतःचे दु:ख दूर करण्यासाठी सुख मागायला आले आहेत, त्यांचाच लाभ उठवता? जे सुखाचे भिकारी आहेत, त्यांच्याकडून तुम्ही सुख घेता? कसे आहात तुम्ही? त्यांच्याकडून तुम्ही एक पै देखील कसे घेऊ शकता? म्हणजे ते तुमच्याजवळ भिकारी आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर भिकारी आहात! तुमचाही भिकारीपणा सुटत नाही!! मग आत ज्ञान कसे प्रकट होईल? ज्ञान प्रकट होणारच नाही ना! ज्ञान तर, जिथे

Loading...

Page Navigation
1 ... 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72