________________
चमत्कार
__17
म्हणाले, 'आमची शंभर रुपयांची पैज.' मी म्हणालो, नाही. 'हे पैजेसाठी करायचे नाही. आम्हाला घोडेस्वारी करायची नाही. शंभरच्या ऐवजी दहा रुपये काढ. नंतर मग आपण चहा-नाश्टा करू.' आणि त्या काळात तर दहा रुपयात खूप काही मिळत असे!
आमच्या इथे बडोद्यात एक न्याय मंदिर आहे, तिथे एक सेन्ट्रल हॉल होता. तिथे एका मित्राची ओळख होती. म्हणून त्या हॉलमध्ये हा प्रयोग करण्याचे ठरले. तशी तिथे फारशी माणसे जमली नव्हती. आम्ही दहा, आणि इतर पाच-पंचवीस माणसं होती. तेव्हा तिथे मी हा प्रयोग केला. तिथे एक स्टोव्ह मागवला, कागदाची कढई बनवली आणि भजीचे पीठ कालवले. तसे तर मला भजी बनवता येत होती. लहानपणी खाण्याची सवय ना, म्हणजे घरी कोणी नसेल तेव्हा आपण स्वतः बनवून खाऊन घ्यायचे. मग या इथे मी तेल ठेवले आणि नंतर कढई स्टोव्ह वर ठेवतेवेळी अगोदर मी काय केले ? असे केले. हात खालीवर करून जादुमंतर करतात तसा अभिनय केला. म्हणून मग ते सर्वजण असे समजले की ह्याने काही मंत्र उच्चारला! कारण असे नाही केले तर लोक घाबरले असते. म्हणून त्यांना हिंमत रहावी त्यासाठी केले. नाहीतर त्यांच्या भीतीचा परिणाम माझ्यावर झाला असता, सायकोलॉजी असते ना? की आता पेटेल, जळून जाईल! तो मंत्र उच्चारला ना, म्हणून ते लोक उत्कंठतेने एकटक पाहतच होते की काहीतरी मंत्र उच्चारला असेल! मग मी कढई स्टोव्ह वर ठेवली. पण काही पेटली नाही म्हणून त्यांना वाटले की निश्चितच मी काही मंत्र उच्चारला! तेल उकळले की मग मी एक-एक भजी आत टाकत गेलो. भजी तर आत तळू लागल्या! अशा प्रकारे मग दहा-बारा भजी तळल्या आणि सगळ्यांना एक-एक भजी खाऊ घातली. कदाचित थोड्याफार कच्च्या राहिल्या असतील कारण की त्या मोठ्या होत नाही ना! भांडे छोटे ना! हे तर फक्त त्यांना एवढे समजवण्यासाठी करायचे होते की असे होऊ शकते. नंतर सगळे मला म्हणू लागले की, 'तुम्हाला तर चमत्कार करता येतो, त्याशिवाय हे कसे शक्य आहे ?' मी म्हणालो, 'हे जर तुला शिकविले तर तू सुद्धा करू शकशील. म्हणजे जे दुसऱ्यांना येते, त्यास चमत्कार म्हणू शकत नाही."