________________
चमत्कार
प्रश्नकर्ता : इथे शेजारी एक मंदिर आहे, तिथे महोत्सव सुरु आहे. तर दोन दिवसांपूर्वी तिथे अमृतवर्षा झाली होती आणि ती दोन-तीन तासांपर्यंत चालली. पुन्हा आज असेही सांगतात की तिथे केशराचे शिंतोडे पडले आहेत. तिथे खूप पब्लिक जमा झाली आहे.
दादाश्री : पण घरी जाऊन आपले मतभेद तर तसेच राहिले ना! क्रोध-मान-माया-लोभ त्याचे तेच राहिले. म्हणजे अमृतवर्षा होवो की न होवो, त्यामुळे आपल्यात काही बदल झाला नाही!
प्रश्नकर्ता : पण अमृतवर्षा झालेली जी मूर्ति असते, त्याचे दर्शन केल्याने काहीतरी लाभ तर होत असेल ना, दादा?
दादाश्री : लाभ होत असेल तर घरी गेल्यावर मतभेद कमी झाले पाहिजेत ना? अशी अमृतवर्षा पुष्कळ वेळा झाली आहे, पण मतभेद कोणाचेही कमी झालेले नाहीत. आपले मुख्य काम काय आहे की मतभेद कमी झाले पाहिजेत. क्रोध-मान-माया-लोभ कमी झाले पाहिजेत, आणि शांती वाढली पाहिजे. एवढे मुख्य काम आहे ना? ती अमृतवर्षा होवो की न होवो, त्याच्याशी आपले काय काम आहे? पण तरी हे असे सर्व देवता करीत असतात. म्हणून आपण त्यास खोटे म्हणू शकत नाही. परंतु आपले क्रोध-मान-माया-लोभ घटत नाहीत, मग त्याचा आपल्याला काय उपयोग?
प्रश्नकर्ता : पण दादा, यात आपले ज्ञान घेतलेल्या महात्म्यांनी काय समजावे?
दादाश्री : महात्मा या भानगडीत कशासाठी पडतील? तिथे केशर ओतले जात असेल तरीही महात्मा कशासाठी बघायला जातील? असे ढीगभर केशर वाहत असेल तरीही कशासाठी बघायला जातील? उगाचच वेळ वाया जाईल! असा वेळ वाया घालवून काय फायदा? आपण शुद्ध उपयोगात का राहू नये? नाही रहावे? ज्याला शुद्ध उपयोग मिळाला आहे, तो तर शुद्ध उपयोगातच राहणार ना? हे तर ज्याला श्रद्धा बसत नसेल, त्याची श्रद्धा बसविण्यासाठी देवलोक करतात, किंवा दुसरे लोकही करतात! कित्येक वेळी तर देवलोकही करत नाहीत, त्यास मनुष्य चमत्कार