Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 58
________________ चमत्कार पूर्वी आपल्या इथे फुलांचे हार घालत होते. तेव्हा पाच-पंचवीस हार येथे असायचे, तर एखादा माणूस इथून हार घेऊन जायचा आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील आजारी माणसांना ते हार घालत असे आणि त्यांना सांगायचा की, 'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' असे बोला. तर सकाळी डॉक्टर म्हणत असत की ‘ह्या रुगणांमध्ये एवढा फरक कसा काय पडला?' प्रश्नकर्ता : तरी सुद्धा ते चमत्कार नाही, असे आपण सांगता? दादाश्री : हो, चमत्कार केला असे आपण म्हणत नाही आणि हे जे ऐकले ना, याहीपेक्षा खूप मोठे घडले आहे, हे जग फीदा होऊन जाईल असे घडले आहे, पण त्यास जर चमत्कार म्हणाल तर दुसऱ्यांचे चमत्कार चालूच राहतील. म्हणूनच मी हे चमत्कार तोडण्यासाठी आलो आहे. खरेतर, वास्तवात हे चमत्कार नाहीतच. हा आमचा फोटो सुद्धा खूप काम करतो. म्हणून शेवटी मग लोकांना आम्ही फोटो देत असतो. कारण जर इतके काम केले नाही तर ही 'भांडी' स्वच्छ होतील असे नाही. 'भांडी' इतकी घाण झाली आहेत की ती घासून स्वच्छ करता येणार नाहीत. म्हणून निसर्ग काम करून राहिला आहे. सर्व होत राहिले आहे, चमत्कार नाही हा! या सारखी तर दररोज कित्येक पत्रे येतात की, 'दादा, त्या दिवशी तुम्ही सांगितले होते की जा, तुला नोकरी मिळेल, तर मला नोकरी लागली! हे सर्व निसर्ग करीत आहे! मला खूप लोक सांगायला येतात की, 'दादा, तुम्हीच हे सारे केले. हे चमत्कार तुम्हीच केले.' तेव्हा मी म्हणालो, 'भाऊ, मी काही चमत्कारी नाही. मी काही जादुगार नाही आणि मी असे काही करू शकेन असा नाही.' तेव्हा म्हणतात की, मग 'हे कोणी केले?' असे आहे ना की, दादा स्वतःचे यशनाम कर्म घेऊन आले आहेत, म्हणून दादांचे यशगान बोलले जाते. आणि ते यशनाम कर्म तुमचे भले करते. तुमचे निमित्त असते त्यात, त्यात माझे काय? मी त्यात कर्ता नाही ना? म्हणून मी कशाला असा माल खाऊ?! हे लोक तर विनाकारण यश देण्यास येतात. आणि ते यश खाणारे सर्व यश खात राहतात. लोक तर यशाचे भुकेले असतात, म्हणून मग खात

Loading...

Page Navigation
1 ... 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72