________________
चमत्कार
प्रश्नकर्ता : 'दादा भगवान' नां तर कसले यश ? ते तर निर्लेप आहेत ना ?
57
दादाश्री : 'त्यांना' यश नसतेच. 'त्यांना' ती आठही कर्म नसतात. आठ कर्म सर्व माझी आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, नाम, गोत्र, वेदनीय, आयुष्य ही आठही कर्म 'माझी' आहेत.
प्रश्नकर्ता : 'माझी' म्हणजे कोणाची ?
दादाश्री : ह्या 'ज्ञानीपुरुषांची 'च ना !
अक्रम विज्ञान हे सिद्धीचे फळ
प्रश्नकर्ता : कित्येकदा मला असे वाटत राहते की दादा जेव्हा हे ज्ञान देतात तेव्हा एका तासातच स्वतःच्या स्व- पदात आणून ठेवतात. यास काय म्हणावे ?
दादाश्री : हा चमत्कार नाही.
प्रश्नकर्ता : तर हे वचनबळ म्हटले जाते ?
दादाश्री : नाही, ही सिद्धी आहे. यास चमत्कार म्हणू शकत नाही. चमत्कार तर दुसरा कोणी करू शकत नाही. आणि हे तर माझ्यासारखा दुसरा कोणी अक्रम विज्ञानी असेल तो करू शकेल. जेवढे सिद्धत्व प्राप्त केले असेल तेवढे करू शकेल.
हे इथे जे होतात ना, असे चमत्कार नसतातच ना, एका मनुष्याला मोक्ष देणे ही काय अशी - तशी गोष्ट आहे ! अरे, एका माणसाला चिंतामुक्त करणे ही पण काय अशी - तशी गोष्ट आहे ! इतर सर्व ठिकाणी तर थोडा वेळ सत्संगात बसला असेल, आणि तिथून बाहेर गेला की परत तीच चिंता. जसा होता तसाच राहतो. आणि इथे तर कायमसाठी चिंतामुक्त होऊन जातो ना! तरी देखील तो चमत्कार नाही, सायन्स आहे !
आमच्या पुतण्याचा मुलगा काय सांगत होता की दादांना पाहताच आत्म्याला गारवा पोहोचतो. आत्मा तृप्त होतो. दादा तुम्हाला पाहताच