Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 57
________________ 46 चमत्कार नाही! जग आपली सही मागत असते की चमत्कार ही खरी गोष्ट आहे की खोटी? चमत्कार खोटी गोष्ट आहे. प्रश्नकर्ता : पण असे घडत असते, दादा ! दादाश्री : असे सर्व खूप ठिकाणी होत असते. म्हणून त्यांना समजावतो की, 'हो, मी आलो होतो.' कारण सूक्ष्म शरीर फिरत असते, हे मी पाहू शकतो. अमेरिकेत सुद्धा जाते. मी अमेरिकेत होतो तेव्हा या इथे अहमदाबादचे संघपती रमेशभाऊ यांची पहाटे येऊन विधी केली होती, अमेरिकेला त्यांचे पत्र आले होते की 'तुम्ही येऊन माझी विधी केली, माझे तर कल्याण झाले!' अशी तर पुष्कळ लोकांची आपल्या इथे पत्रे येतात. असे वारंवार होतच असते. पण आपण जर यास चमत्कार म्हटले तर यामुळे गैरसमज जास्त पसरेल. मग ते दुर्बल लोक याचा जास्त लाभ उठवतील. म्हणून आपणच चमत्काराला उडवून टाका ना, इथूनच ! ज्याला मोबदला पाहिजे असेल तो बोलेल, मान्य करेल की हो भाऊ, चमत्कार आहे माझा(!) आपल्याला तर काही मोबदला नकोच असतो! म्हणून हे उडवून टाका. हा चमत्कार नाही. हे तर आमचे यशनाम कर्म आता यास चमत्कार म्हटला जात असेल तर असे आपल्या इथे दररोज शंभर- शंभर, दोनशे-दोनशे चमत्कार घडत असतात. पूर्वीच्या संतानी दहा चमत्कार केले असतील, तर लोक त्याचे मोठे मोठे पुस्तक रचून दिखावे करतात. इथे तर असे रोजचे दोनशे-दोनशे चमत्कार घडत असतात ! कोणी म्हणतो, 'घरी माझ्या भावाला खूप ताप येत आहे, आज पंधरा-वीस दिवस झाले तरीही ताप उतरत नाही.' मग माझा एक हार त्याला देतो, तर दुसऱ्याच दिवशी पत्र येते की ताप पूर्णपणे गेला आहे. हार घातल्याबरोबरच ताप उतरला. असे सर्व कितीतरी केसेस होत असतात. हे तर आमचे 'यशनाम' कर्म आहे. आणि जे चमत्कार करतात त्या संतांचेही यशनाम कर्म असते.

Loading...

Page Navigation
1 ... 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72