________________
12
चमत्कार
नसते, तिथे काहीच नसते आणि जिथे 'काही असते' तिथे सीक्रेट असते. त्यांच्या खोलीत ठराविक वेळेपर्यंत जाऊ देत नाहीत. जेव्हा इथे तर वाटेल तेव्हा 'एट एनी टाइम' येऊ शकता, रात्री बारा वाजता, एक वाजता ! काही सीक्रेसीच नाही, मग काय ? सीक्रेसी नाही त्याचप्रमाणे काही डिप्रेशन सुद्धा पाहायला मिळणार नाही. कुठल्याही वेळी, एट एनी टाइम, कुठल्याही क्षणी दादाजी डिप्रेशनमध्ये असूच शकत नाहीत. एलिवेशनमध्ये तर राहतच नाही पण डिप्रेशन सुद्धा नसते ! ते परमानंदातच असतात !
म्हणजे मला या सिद्धी वापरायच्या असतील तर वेळ लागेल का ? का वेळ लागेल ! जे मागेल ते मिळेल, पण मी भिकारी नाही. कारण 'ज्ञानीपुरुष' कोणास म्हणतात ? ! स्त्रियांची भीक नाही, लक्ष्मीची भीक नाही, सोन्याची भीक नाही, मानाची भीक नाही, कीर्तीची भीक नाही, कोणत्याही प्रकारची भीक नसते तेव्हा हे पद प्राप्त होते !
येते संकट धर्मावर, तेव्हा...
शेवटी, 'ज्ञानीपुरुष' तर देहधारी परमात्माच म्हटले जातात. म्हणजे त्यांची गोष्ट तर वेगळीच आहे ना ? ! ते हवे तेवढे करू शकतील, पण ते तसे करत नाही ना, अशी जोखिम अंगिकारणारच नाही ना! हो, जर धर्मावर दडपण येत असेल, धर्मावर संकट येत असेल, धर्म अडचणीत येत असेल तेव्हा करतात, अन्यथा करीत नाहीत.
प्रश्नकर्ता : म्हणजे लौकिक धर्मावर काही संकट येते तेव्हा 'ज्ञानीपुरुष' सिद्धी वापरतात ?
दादाश्री : नाही, लौकिक धर्मावर नाही, फक्त धर्म, म्हणजे जी अलौकिक वस्तू आहे ना, तिथे संकट आले असेल तेव्हा सिद्धी वापरतात. बाकी, हे लौकिक धर्म तर लोकांचे मानलेले धर्म आहेत. त्याचा काही ठिकाणाच कुठे आहे? आपले महात्मा संकटात असतात, तेव्हा तर वापरावीच लागते ना! पण तेही आम्ही सिद्धी वापरत नाही, फक्त ओळख असल्यामुळे (देवी-देवतांना) कळवतो. विनाकारण सिद्धी खर्च केली जाऊ शकतच नाही ना !