Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 36
________________ चमत्कार आम्ही अमेरिकेत गेलो होतो तेव्हा एक व्यक्ति मला म्हणाला की, 'मला आत्मज्ञान जाणायचे आहे !' मी विचारले, 'सध्या काय करता?' तेव्हा तो म्हणला, 'ह्या संतांनी सांगितल्याप्रमाणे करतो.' मी म्हणालो, 'त्यामुळे तुम्हाला काय मदत झाली?' त्यावर तो म्हणाला 'आम्ही डोळे मिटतो तेव्हा आम्हाला ते दिसत राहतात.' मी म्हणालो, 'तिथे स्थिरता राहत असेल, तर माझ्याकडे येण्याची काय गरज आहे? माझ्याकडे तर, तुम्हाला स्थिरता राहत नसेल तर या.' ज्याला जिथे कुठेही स्थिरता राहत असेल, त्याला विनाकारण स्थिरता सोडवून येथे येऊ दिले, तर तू ती फांदीही सोडून देशील आणि ही फांदीही सोडून देशील, तेव्हा मग तुझी काय अवस्था होईल? आपण सांगितल्याने तो ती फांदी सोडून देईल आणि जर ही फांदी पकडू शकला नाही, तर? हिशोब बिघडेल ना मग सर्व?! जो एका जागी रंगलेला असेल, त्याला मी इथे येण्यासाठी मनाई करतो, पण ज्याला कोणत्याही गोष्टीत संतोष वाटतच नाही, त्याला सांगतो, की 'भाऊ, तू इथे ये!' संतोष होत नसेल त्यालाच! कारण की 'क्वॉन्टिटी' साठी हा मार्ग नाही 'क्वॉलिटी' साठी आहे. 'क्वॉन्टिटी' म्हणजे मला इथे लाख माणसे गोळा करायची नाही. काय करायचे लाखो लोक गोळा करून? मग बसायला जागाही मिळणार नाही, आणि तुमच्यासारख्यांना, ह्या सर्वांना इथे कोण बसू देईल? इथे तर क्वॉलिटीची गरज आहे, क्वॉन्टिटीची नाही. तरीही हळूहळू करत इथे पन्नास हजार माणसे झाली आहेत. आणि जर क्वॉन्टिटी शोधण्यास गेलो असतो तर पाच लाख माणसे जमा झाली असती! मग आम्ही काय करावे? कुठे बसवावे सगळ्यांना? येथे बसण्याचे स्थळही नाही. हे तर ज्यांच्याकडे जातो, तेच स्थळ. कुणाच्या तरी घरी जात असतो ना? कारण आपल्या इथे तर काय सांगितले जाते की, 'जे सुख मी प्राप्त केले, ते सुख तू प्राप्त कर आणि संसारातून सुटका करून घे.' बस, आपल्या इथे दुसरा मार्ग नाही. म्हणजे एखादा धर्म असा असतो की त्यात कित्येक माणसांना भीती दाखवून कुसंग मार्गापासून वळवले जाते आणि त्यांना सत्संगात ढकलले जाते, असे चमत्कार चांगले आहेत. जे लोक कुसंगींना धर्मात आणण्यासाठी त्यांना भगवंताच्या नावावर घाबरवतात, तर आपण त्यांना एक्सेप्ट करतो की

Loading...

Page Navigation
1 ... 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72