________________
चमत्कार
चमत्कार म्हणत नाही. लोक मला येऊन सांगतात की, 'दादा, हा तुम्ही चमत्कार केला. मला असा लाभ झाला.' मी म्हणालो, 'हा चमत्कार नव्हे.' बाकी आपल्या इथे तर थोडे-फार नाही पण अपार चमत्कार होत असतात. पण ते काय आहे? तर हे माझे यशनाम कर्म आहे. म्हणजे फक्त माझा हात लागला की तुमचे कल्याण होते आणि त्याचे यश तुम्ही मला देता की हे सर्व दादाजींनी केले. पण त्यात माझे काय? हे तर यशनामकर्माने केले आहे! कोणी केले?
प्रश्नकर्ता : पण तरी देखील दादांनी केले असे तर म्हटले जाईल ना?
दादाश्री : नाही, दादांनी नाही, जे यशनाम कर्म आहे ना, ते कर्म असते. कर्म वेगळे आणि आपण वेगळे. ते कर्म आपल्याला फळ देते. ते यशनाम कर्म खूप मोठे असते म्हणून आम्हाला सगळे जण यशच देत राहतात.
___ तुम्हाला याची खात्री आहे का, की जैन शास्त्रकारांनी नामकर्मात यशनामकर्म आणि अपयशनामकर्म लिहीले आहे? कित्येक माणसे अशी असतात की काम केले तरी त्यांना अपयश मिळते, असे तुमच्या ऐकण्यात आले आहे ? त्याचे कारण काय? तर ज्याचे अपयशनामकर्म असते, त्याला अपयशाचे फळ मिळते. त्याने चांगले काम केले तरीही त्याला नेहमी अपयशाचेच फळ मिळते. म्हणजे त्याने अपयश बांधले आहे, आणि मी करत नाही तरीही यश मिळत राहते, त्याचे काय कारण? तर हे यशनामकर्मामुळे आहे.
मी पुष्कळ लोकांना सांगतो, हे ज्ञान होण्यापूर्वी सांगत होतो की सांसारिक गोष्टींमध्ये मला नेहमी यश मिळत होते. मी सांगायचो की, 'भाऊ, यात मी पडलोच नाही, मी काही केलेले नाही, मला माहितही नाही आणि हे कोणी दुसऱ्याने केले असेल, म्हणून हे यश त्यांनाच द्या.' कारण मला माहित आहे की जे तुमचे यश असेल ते मला देऊन टाकले, तर तुम्हाला कोरडेच ठेवतील ना? केले असेल तुम्ही आणि यश मला देतात. तुमच्या मनात कशी अपेक्षा असते? तुम्हाला वाटेल की हा माणूस मला