________________
26
चमत्कार
त्या लोकांना घाबरवून का होईना पण धर्मात आणले जाते. त्यास हरकत नाही, ते चांगले आहे. त्यांची दानत खोटी नाही. कुसंग म्हणजे शिव्या देत असेल, पत्ते खेळत असेल, चोरी करत असेल, बदमाशी करत असेल, त्यांना भीती दाखवून सत्संगात आणले तर त्यास हरकत नाही. जसे आपण मुलांना भीती दाखवून योग्य मार्गावर नाही का आणत ? या बालमंदिराचा मार्ग काढला तर ती गोष्ट वेगळी आहे. पण दुसरे जे चमत्काराने नमस्कार करवून घेऊ इच्छितात, त्या सर्व 'निरर्थक' गोष्टी आहेत. मनुष्याला असे शोभत नाही ! बाकी, वीतराग सायन्स तर असे काही करतच नाही.
देवतांचे चमत्कार खरे
प्रश्नकर्ता : कित्येकांजवळ अंगारा येतो ना ?
दादाश्री : त्या अंगाऱ्यावाल्याला मी असे सांगेन की, 'मला अंगारा नको, पण तू ते स्पेनचे केशर काढ. मला जास्त नको, फक्त एक तोळाच काढ ना, तरी भरपूर झाले. ' हे तर सगळे मूर्ख बनवतात.
आता इथे, या संदर्भात दुसरी पण एक गोष्ट आहे, जेणे करून आपण सर्वांनाच खोटे म्हणायचे नाही. कारण असे देवी-देवता आहेत की जे अंगारा टाकतात. त्यांच्याकडे अंगारा कसा असेल ? पण ते तर इथून उचलून तिथे दुसऱ्या जागी टाकतात, आणि त्यांना वैक्रियिक शरीर (देवतांचे अतिशय हलक्या परमाणुंचे बनलेले शरीर जे कोणतेही रुप धारण करू शकते.) असते. आपल्याला ते समजतही नाही. असे चमत्कार देवीदेवताही करतात. म्हणजे यात एखाद्याने त्या देवाला साध्य केले असेल, त्यामुळे असे घडते. पण तरी तो चमत्कार नाही. त्यासाठी कोणाची तरी मदत घेतलेली आहे, बस ! चमत्कार तर स्वतः स्वतंत्र रितीने करत असेल, तो आहे. आता हे मी सांगत आहे, या प्रमाणे तर एकच टक्का लोक करीत असतात, दुसरे सर्व एक्जेगरेशन (अतिशयोक्ति) आहे. नव्याण्णव टक्के सर्व खोटे एक्जेगरेशन आहे, अगदीच !
आपल्या हिंदुस्तानात कित्येक संत आहेत, ते अंगारे काढतात. पण तो देवी-देवतांचा आहे, त्यात बनावट नसते, पण त्यात चमत्कारासारखे काही नाही.