Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 67
________________ 56 चमत्कार उघडले. तेव्हा म्हणे, ‘जो प्रकाश दादांच्या डोळ्यांतून माझ्या डोळ्यात येत होता, तोच प्रकाश मी लुटारुंच्या डोळ्यात जाताना पहिला. ते लोक घाबरले. त्या लोकांनी तोंडावर बुकानी बांधलेली होती, फक्त दोन डोळेच दिसत होते. आणि म्हणाली, माहित नाही, त्यांच्यात एकदम परिवर्तन झाले. ती बाई त्यांना म्हणाली, 'बघा भाऊ, हा तर टाइम लॉक (कुलूप) आहे. माझ्याजवळ दुसरे काहीच नाही. मला तर काहीच माहित नाही. जे काही आहे ते हेच आहे.' मी जे जे त्यांना सांगत होते, ते सर्व ते मान्य करत गेले. त्यावेळी पोस्ट ऑफिसमध्ये दहा लाख पाउन्ड होते. एकूण दहा लाख पाउन्डची नगद रक्कम होती, पोस्टात तर सर्व पैसे ठेवतात ना! आणि आठ-दहा हजार पाउन्ड तर ड्रॉवर उघडले की समोरच होते. पण ती बाई त्यांना म्हणाली की 'काहीच नाही.' म्हणून दुसऱ्या ड्रॉवरमध्ये फक्त सव्वाशे पाउन्ड होते, ते घेऊन निघून गेले. ही बातमी आठ-दहा दिवसांपर्यंत लंडनच्या पेपरात हेडलाईन्समध्ये आली होती. दादाश्री : सगळे पेपरवाले हे छापतच राहिले! 'दादा भगवान' तर राहतात निर्लेप या 'दादा भगवानांचे' नाव घेतात ना, त्यांचे प्रत्येक कार्य सफल झालेले आहे. यात यशाचा मी भागीदार आहे. हे माझे यशनामकर्म आहे, असे यशनामकर्म तर क्वचितच कोणाचे असते. बाकी संसारी यशनामकर्म असते, तर हे अमके लग्न करायचे होते, ते होऊन गेले. म्हणजे हे एक प्रकारचे यशनामकर्म आहे. असे मला या बाबतीत यशनामकर्म आहे. म्हणून 'दादा भगवान' 'मला' हे माझे यशनामकर्म पूर्ण करवितात. ते एक, दोन नाही, पण याहीपेक्षा मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगतात लोक. पुष्कळ उदाहरणे पाहिली आहेत. त्यास हे लोक काय म्हणतात, 'तुम्ही चमत्कार करतात का?' मी म्हणालो, 'नाही, मनुष्य चमत्कार करू शकतच नाही. मनुष्याला बुद्धिने असे वाटते की हे चमत्कार करतात. पण जर त्याला शास्त्र समजत असेल तर यशनाम हे एक नामकर्म आहे.' म्हणजे हे 'दादा भगवानांचे' काम आहे आणि यशफळ मला मिळत राहते. 'त्यांना' यश नको आहे. आणि यशनाम कर्म तर 'माझे'च ना!

Loading...

Page Navigation
1 ... 65 66 67 68 69 70 71 72