________________
चमत्कार
तांदूळ टाकायचे असतील तर टाका आणि टाकायचे नसतील तरीही मला ते कामाचे नाही. मला तर क्रोध-मान-माया-लोभ कमी होतील आणि शांती होईल असे करून द्या.' असे सांगण्यास आपल्याला काय हरकत आहे बरं?
प्रश्नकर्ता : नाही, पण हे तर ज्याला श्रद्धा नसेल, त्याला भगवंतावर श्रद्धा बसावी म्हणून असे घडत असेल ना?
दादाश्री : हे तर अंधश्रद्धाळू लोकांना श्रद्धा बसविण्यासाठी आहे. अरे.... त्यात आणि कित्येक ठिकाणी तर.... रात्री मंदिरात घंटा वाजते, म्हणून मग दुसऱ्या दिवशी सगळे लोक दर्शन करण्यास येतात, अगदी धावत-पळत!! आणि मी तर सांगेन की तू लाख वेळा घंटा वाजवशील तरीही माझ्या काय कामाचे? मला तर आत गारवा (शांतता) उत्पन्न होईल असे होत असेल, तर येईन तुझे दर्शन करण्यास. नाहीतर मला ते काय उपयोगाचे? मला जरी खूप दुःख होत असेल, तरीही मी तावडीत येणार नाही. यात लक्ष द्यायचे असते का? आपण काय लहान मूल आहोत की थोडासा प्रसाद दिला की धावपळ करायची? तुम्हाला समजतय ना?
बाकी, हे जग तर सर्व असेच आहे, लालची आहे आणि जर पेढे पडतील ना, तर संपूर्ण मुंबई तिथे जाईल. रुपये का पडत नाहीत? सोन्याचे नाणे पडले तर किती मोठे काम होईल! लगेचच लोकांची दरिद्रता संपेल ना? एक-एक नाणे जरी हातात आले तरी लोक बिचारे दुसऱ्या दिवशीच आंबे आणतील की नाही? पण हे तर तेच तेच भस्म पडत असेल काही ठिकाणी, तर काही ठिकाणी कुंकवाचे शिंतोडे पडत असतील!
या वीतराग मार्गात आत्मा प्राप्त होईल तरच खरे, अन्यथा सर्व निरर्थक आहे. आणि आत्मा प्राप्त करण्याची जर कोणती भूमिका असेल तर मनुष्यगती ही एकच भूमिका आहे. बाकी इतर कुठेही आत्मा प्राप्त होऊ शकेल अशी भूमिकाच नाही. तिथे तर भटकून-भटकून मरायचे आहे. अर्थात् आत गारवा झाला पाहिजे, शांती झाली पाहिजे. आपल्याला अशी खात्री झाली पाहिजे की आता माझा मोक्ष होईल! तुम्हाला अशी खात्री झाली आहे की मोक्ष होईल?
प्रश्नकर्ता : एकशे एक टक्के खात्री झालेली आहे!