Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 34
________________ चमत्कार 23 देणारा कोणी असा-तसा असतो का ? हे विचारेल, ते विचारेल, त्याचे हाल करून सोडेल. त्यावेळी तर सगळेच पळून गेले. मोठ-मोठे 'जज' तिथे बसले असतील, ते तर लगेचच पकडतील की हे चमत्कार इथे नाही चालणार. ह्या लोकांनी चमत्कारा विषयी खूप खोटे ठसवून दिले आहे पण आपले लोकही लालची आहेत ! म्हणून तर ही सगळी भानगड आहे ना ! फॉरेनमध्येही चमत्कार चालतात. ते सुद्धा थोडेथोडे लालची आहेत. हा 'माझा मुलगा आहे ना, त्याला मुलगा नाही' असे म्हणतात. अरे, तुला तर मुलगा आहे ना ? हे लटांबर कुठपर्यंत चालेल ? हे तर एका दुधी नंतर दुसऱ्या दुधी उगवतच राहतात. एकच दुधी उगवणार आहे का? वेल वाढली तितक्या दुधी उगवतच राहणार. बस, ही एकच लालूच, 'माझ्या मुलाच्या घरी मुलगा नाही. बाकी, चमत्कारासारखे काहीच नाही आणि तू चमत्कार करणारा असशील तर असा चमत्कार कर ना की भाऊ, या देशात बाहेरील देशातून धान्य मागवावे लागणार नाही. एवढे केलेस तरी खूप झाले. असा काही चमत्कार कर. हा तर नुसता भस्म काढतो, घड्याळ काढतो, आणि लोकांना मूर्ख बनवतो ! दुसरे चमत्कार का नाही करत? त्याचे तेच घड्याळ आणि तेच तेच भस्म! आणि काही काढून दिले, अमके काढून दिले, घड्याळ काढून दिले, तर आपण सांगावे ना की भाऊ, त्यापेक्षा तू धान्य काढ ना, फॉरेनहून आणावे तर लागणार नाही ! प्रश्नकर्ता : हे सर्व लोक जे चमत्कार करतात, तर असे चमत्कार करून ते काय सिद्ध करू इच्छितात ? दादाश्री : चमत्कार करून त्यांची स्वत:ची महती वाढवतात. महती वाढवून या दिशाभूल झालेल्या (अंधानुकरण करणाऱ्या) लोकांपासून स्वत:चा लाभ उठवतात. पाच इंद्रियांच्या विषयासंबंधी सगळा लाभ उठवतात. आणि कषाय संबंधीही लाभ उठवतात, सर्व प्रकाराचा लाभ उठवायचा आहे, म्हणून आपण 'चमत्कार' वस्तुलाच उडवून देऊ इच्छितो की, भाऊ अशा चमत्कारात फसू नका. पण लालूच असल्यामुळे हा दिशाभूल झालेला प्रवाह तर फसणारच आहे, आणि कोणीही व्यक्ति जर लालची असेल

Loading...

Page Navigation
1 ... 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72