________________
चमत्कार
माणसाने देवाचे उपकार मानले तरी पुष्कळ आहे. तुझ्याकडून मला काहीही नको. तू जर देवाचे उपकार मानले की, ओहो! देवाच्या प्रतापाने मी सुटलो, इतके जरी केले तरीही खूप झाले. आणि हे जर मी करीत असेन तर मी दलाली नाही का घेणार? मग तर मी असेच म्हटले असते ना की तुझे काम सफल झाल्यावर इतके टक्के दलालीचे द्यावे लागतील. म्हणून आम्ही तो व्यापारच बंद केला. काम करण्याचे, आणि नाही करण्याचे दोन्हीही बंद करून टाकले ना!
प्रश्नकर्ता : आत्म्याची गोष्ट तर चालूच आहे ना!
दादाश्री : यात आत्म्याच्या गोष्टींचा काही संबंध नाही. ह्या गोष्टीत मोबदला नसतोच. याचा मोबदला नसतो, याचा जर मोबदला द्यावा लागत असेल तर ही गोष्ट फळणारच नाही.
प्रश्नकर्ता : या ज्ञानात तर काही घेण्याचे नसते, यात तर देण्याचीच गोष्ट आहे ना?
दादाश्री : हो. बस. कारण की यात तुम्ही बदल्यात काय देणार? पुद्गल द्याल. आणखी काय द्याल? आणि याची किंमत जर पुद्गल असेल तर मग तो आत्माच नाही. अमूल्य वस्तुची वेल्यू नसते!
मलाच चूर्ण घ्यावे लागते तर.... इथे एक भाऊ येत असतात. त्यांचे वडील ७८ वर्षांचे होते. ते आमच्या गावचे होते. मी त्यांच्या घरी त्यांना दर्शन देण्यास जात होतो. त्यांनी स्वत:च्या वडिलांना सांगितले की, 'आज दादा दर्शन देण्यासाठी येणार आहेत.' ७८ वर्षाच्या माणसाला इथे कसे आणू शकतो? पण त्यांनी काय केले? घराबाहेर निघून रस्त्यावर येऊन बसले. मग मी तिथे गेलो तेव्हा मी त्यांना विचारले की, 'तुम्ही असे रस्त्यावर बसता, हे काही बरे दिसते का? यात काय फायदा? ते सांगा. तेव्हा ते म्हणाले, इथे खाली येऊन बसलो तर दोन मिनिटे लवकर दर्शन होतील! आणि घरात तर तुम्ही याल तेव्हा दर्शन होतील! पण मी म्हणालो, खाली तर धूळ....? तेव्हा म्हणाले, 'असू दे धूळ, अनंत जन्म धुळीतच गेले ना आमचे! आता या जन्मात तुम्ही