________________
चमत्कार
__ 19
मूर्ख बनवतो की, 'हे पाहा मी करतो.' म्हणून आपल्यालाही असे वाटते की हा चमत्कार केला आणि विज्ञान जाणल्या नंतर तो चमत्कार दोन टक्क्याचा!
भगवंतांनी सुद्धा भोगले कर्म अर्थात् ही सर्व फसवणूक आहे. आणि सगळ्यांचे ऐकावे पण ते जर 'सायन्स' मान्य करेल असे असेल तरच मानावे. असेच फक्त खोटेनाटे चालत नाही. असे खोटेनाटे नसावे. कारण की कृष्ण भगवंतांना तुम्ही ओळखता का? हे कृष्ण भगवंत असे पायावर पाय ठेवून झोपले होते आणि त्या पारध्याला असे वाटले की हे हरीण आहे. म्हणून त्या बिचाऱ्याने बाण मारला. आणि तो बाण लागल्यामुळे भगवंतांनी देह सोडला ही गोष्ट माहित आहे? ते तर नारायण स्वरुप होते. हे माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला त्यांची जेवढी किंमत नसेल, तेवढी किंमत आम्हाला आहे. कारण की नारायण स्वरुप म्हणजे नराचे नारायण झालेले पुरुष! कोण ते पुरुष! शलाका पुरुष, वासुदेव नारायण! तर वासुदेव नारायणांची अब्रू घेईल असे हे जग, तेव्हा दुसऱ्यांची तर काय बरोबरी? म्हणजे दुसरे लोक तर उगाचच ऐटीत फिरतात ना! तुम्हाला समजतय ना?
द्रौपदीच्या चीरचा चमत्कार? प्रश्नकर्ता : तरी सुद्धा कृष्ण भगवंताने द्रौपदीला वर राहून चीर (वस्त्र) पुरवले होते, असे सांगतात ना?
दादाश्री : अरे, ह्या तर वेडेपणाच्या गोष्टी, द्रौपदीचे वस्त्र ओढले आणि कृष्ण भगवंताने पुरवले(!) आणि आपले लोक हे मानूनही घेतात. अरे, पण कोणत्या मीलचे कापड होते?!
प्रश्नकर्ता : पण एक गोष्ट तर आहे, की अशा गोष्टीमुळे प्रजेत धार्मिक भावना टिकून राहते ना?
दादाश्री : धर्माची भावना टिकून राहते, ती तर कित्येक वर्ष टिकून राहिली आणि नंतर त्याची 'रिएक्शन' आली. असे होत असेल का? उलट