________________
चमत्कार
37
लागले. दुःख येऊ नये म्हणून देवतांनी भगवंतांना सांगितले होते. त्यावर भगवंत म्हणाले, 'तसे कधी घडले नाही, घडणारही नाही, आणि भस्मक ग्रह येणार आहे आणि तसे घडणारच आहे.' ही विज्ञानाची भाषा!! आणि या अहंकाराच्या भाषेत ज्याला जसे योग्य वाटेल तसे बोलतात ना! 'मी तुम्हाला वाचवले.' असेही म्हणतात. आपले सर्व संत असेच बोलतात. त्यामुळे त्या संतांनी अध्यात्म्यात एक पै सुद्धा कमवली नाही. अजूनपर्यंत आत्म्या सन्मुख गेले नाहीत. अजून तर तीन योगातच आहेत. मन-वचनकायेच्या योगातच आहेत, आत्मयोगाकडे वळलेच नाहीत. आता याहून जास्त काही सांगितले तर वाईट दिसेल. मी असे बोलायला नको. म्हणजे ते लोक अजूनपर्यंत योगाच्या प्रक्रियेतच आहेत आणि मनाला, वाणीला, देहाला वश करीत आहेत. पण वश करणारा कोण? अहंकार!
अर्थात् आयुष्य कोणी वाढवू शकत नाही. जर कोणतीही व्यक्ति असे ओरडून सांगत असेल की, 'माझ्यात अशी शक्ति आहे.' तर आपण सांगावे की, शौचाला जाण्याचीही शक्ति नाही आणि उगाच असा का
ओरडत राहतोस? तुझी अब्रू जाईल! विज्ञान स्वीकारत नाही. माझी ही गोष्ट समजतेय का? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : समजत आहे.
दादाश्री : कारण की, माणसांना अशा गोष्टी खूप आवडतात. तसे तर मी सुद्धा बोलतो की तुम्हाला असे सर्व करून देईन आणि लोक सुद्धा सांगतात की, 'दादा, तुम्हीच हे सर्व करता.' 'अरे भाऊ, माझ्यात करण्याची शक्ति नाही. हे सर्व तर माझे यशनाम कर्म आहे. म्हणून ते तुमचे काम करीत आहे. आमच्याकडून एक शब्द सुद्धा चुकीचा बोलला जाऊ शकत नाही आणि यांचे तर काय? अहंकारी तर वाटेल तसे बोलेल. त्यांना कोण अडवणारा? तरी देखील आपण त्यांच्याविषयी बरे-वाईट बोलू नये. कारण त्यांच्या भक्तांसाठी ती गोष्ट खूप मोठे विटामिन आहे आणि त्यांच्या भक्तांची एकाग्रता होत आहे ना, त्यांचे चित एकाग्र होत आहे ना! म्हणून आपण दुसरे काही बोलू नये. दुसरे काही बोलायचे नाही. आपण त्यांच्या भक्तांचे चित्त विचलित करण्यासाठी हे सांगत नाही. हे