________________
चमत्कार
35
वर्षांपूर्वी ह्या पायाला फ्रक्चर झाले होते. तेव्हा अहमदाबादचे मोठे साहेब दर्शन करण्यास आले होते. मला म्हणाले की, 'दादा, हे तुम्ही कोणाचे दुखणे घेऊन आलात?' अरे, ही तुम्ही सुशिक्षित माणसे जर असे बोलाल तर बिचाऱ्या अडाणी लोकांची तर काय अवस्था? तुम्ही शिकले सवरलेले आहात, तुम्हाला स्वतः वर श्रद्धा आहे आणि तरी तुम्ही असे मानून घेता? या जगात कोणीही कोणाचे दुःख किंचितमात्रही घेऊ शकत नाही. हो, त्याला सुख देऊ शकतो. त्याचे जे सुख आहे, त्यास तो हेल्प करतो, पण दुःख घेऊ शकत नाही. हे तर मला माझे कर्म भोगायचे होते. प्रत्येकाला आपापले कर्म भोगावेच लागते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी उत्पन्न केल्या गेल्या आहेत. हे तर लोकांना फसवून दम काढला आहे आणि ते पुन्हा आपल्या हिंदस्तानातील शिकले सवरलेले लोकही खरे मानतात!! प्रतिकार करा ना, की 'घ्या, हे असे करून दाखवा.' पण असे विचारण्याचीही शक्ति नाही ना!! अशी ठोकमठोक चालवून घ्यायची नाही!!
नाही वाढत आयुष्य क्षणभरही प्रश्नकर्ता : मी तर इथपर्यंत ऐकले आहे की, आमचे जे आचार्य आहेत, त्यांनी एका वकीलाचे आयुष्य दहा वर्ष वाढवून दिले.
दादाश्री : आता असे बोलतात म्हणून तर ज्या लोकांना धर्मावर प्रेम आहे ना, तेही सोडून देतील सर्व. आणि असे सांगितले तर आपण विचारावे, 'अरे भाऊ, या वकीलालाच का दिले? दुसऱ्यांना का देत नाही? याचे कारण काय? सांगा बघू? आणि तुम्ही जर देणारे आहात तर दहा वर्षच का दिले? चाळीस वर्ष द्यायचे होते ना!' मी तर असे सर्व शंभर प्रश्न तयार करेन. काय सांगत होते? इथे दहा वर्षांचे आयुष्य वाढवून दिले?
प्रश्नकर्ता : असे मी ऐकले होते.
दादाश्री : ऐकलेले कदाचित खोटेही असते. असे दुसरे काही ऐकले आहे का? कोणत्याही मनुष्याची किंवा गुरुची निंदा करू नये. काय खोटे आहे आणि काय खरे आहे, याची गोष्टच करण्यासारखी नाही, तुम्ही सुद्धा हे सर्व खरे मानले होते? तुम्ही तर शिकलेले आहात, आता तरी तुम्हाला ह्या गोष्टींमधे शंका येईल की नाही?