Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 21
________________ चमत्कार अज्ञानी तर जिथे-तिथे सिद्धी वापरुन टाकतो. त्याच्याजवळ जेवढी सिद्धी जमा झाली असेल, तर लोकांनी त्याला बापजी-बापजी म्हटले की तिथे वापरली जाते. जेव्हा ज्ञानींजवळ तर त्यांची जेवढी सिद्धी जमा झालेली असेल, त्यापैकी एक आणा सुद्धा सिद्धी खर्च होत नाही. 'ज्ञानीपुरुष' तर अद्भूत म्हटले जातात. जग तर अजून त्यांना समजू शकलेच नाही. त्यांच्या सिद्धी तर, फक्त हात लावला आणि काम होऊन जाते. या इथे माणसांमध्ये जे सर्व परिवर्तन झाले आहे ना, तसे परिवर्तन कोणाकडूनही एका माणसात देखील झालेले नाही. हे तर तुम्ही पाहिलेत ना? काय परिवर्तन झाले आहे ते? बाकी, असे तर कधी घडलेच नाही, प्रकृती कधी बदलतच नाही माणसाची! पण तसे सुद्धा झाले आहे आपल्या इथे! आता हे तर मोठ-मोठे चमत्कार म्हटले जातील, आश्चर्यकारक चमत्कार म्हटले जातात. एवढ्या वयात हे भाऊ सांगतात की, 'माझे घर तर स्वर्गासारखे झाले आहे, स्वर्गात सुद्धा असे नसेल!' प्रश्नकर्ता : तीच शक्ति आहे ना! दादाश्री : 'ज्ञानीपुरुषांमध्ये' तर गजबची शक्ति असते, फक्त असे हात लावले की काम होऊन जाते! पण आम्ही सिद्धी वापरत नाही. आम्हाला तर कधीही सिद्धीचा उपयोग करायचा नसतो. ही तर सहजपणे उत्पन्न झालेली असते, आम्ही वापरली तर सिद्धी संपून जाईल! ह्या दुसऱ्या लोकांची तर सिद्धी खर्च होऊन जाते, कमवलेली असते ती खर्च होते. तुमची तर खर्च होत नाही ना? प्रश्नकर्ता : नाही, खर्च करणार नाही. पण अशी सिद्धी उत्पन्न होईल तर चांगले. दादाश्री : अरे, सहज जर चढवले ना तुम्हाला, तर लगेच सिद्धी वापरुन टाकाल तुम्ही! आणि आम्हाला चढवा बघू, आम्ही एकही सिद्धी वापरणार नाही! ज्यांच्या जवळ एवढ्या साऱ्या सिद्धी असताना सुद्धा, त्यांनी एकच फुकर मारली असती तर संपूर्ण जग उलथे-पालथे झाले असते, एवढी

Loading...

Page Navigation
1 ... 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72