________________
चमत्कार
55
प्रश्नकर्ता : पण आम्हाला तर आश्चर्य वाटणारच ना?
दादाश्री : आश्चर्य वाटते, पण मी त्यास चमत्कार म्हणून स्वीकारत नाही.
___ म्हणजे यामागे काहीतरी आहे, समजणार नाही असे रहस्य आहे. बुद्धिगम्य रहस्य नाही, पण समजत नाही असे रहस्य आहे हे. पण मी यास चमत्कार म्हणू देणार नाही. चमत्कार म्हटले म्हणजे मी जादुगार ठरलो. आणि मी काय जादुगार थोडाच आहे? मी तर 'ज्ञानीपुरुष' आहे. आणि शौचाला जाण्याचीही शक्ति माझ्यात नाही. ते 'दादा भगवान' काहीतरी रहस्य आहे, ही गोष्ट मात्र नक्की.
एक बाई स्वतः पोस्ट ऑफिस चालवत होती. ती सकाळी जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये गेली तेव्हा दोन लुटारु आत घुसलेले होते. जशी ती बाई आत गेली तशी त्या बाईला आणि तिच्या वीस वर्षाच्या मुलीला दोरखंडाने बांधले आणि मग म्हणाले, आता चावी दे. तेव्हा ती बाई काय सांगत होती?
प्रश्नकर्ता : तीने सर्व देऊन टाकले आणि मग एकदम बसली. 'आता काय घडणार आहे ते मला माहित नाही. आता ‘दादा भगवान' जे करतील ते खरे,' असे करून बसली. दुसरीकडे वीस वर्षाची तरुण मुलगी पण म्हणाली, 'मला कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही, अजिबात नाही, आणि दादा माझ्या समोर हजर झाले. मला दादांचा साक्षात्कार झाला.'
दादाश्री : इथे येऊन मला म्हणाली, पूर्ण जगात कुणाला साक्षात्कार व्हायचा असेल तेव्हा होईल पण मला तर तिथे साक्षात्कार झाला, स्वतः प्रत्यक्ष पाहिले, आणि हेच सांगण्यास ती इथे आली होती.
प्रश्नकर्ता : मग ती म्हणाली, दादांच्या दोन डोळ्यांमधून लाईट माझ्या डोळ्यात आले, दादांच्या डोळ्यात निव्वळ प्रकाश (तेज) होता! असे किती वेळेपर्यंत चालले ते मला माहित नाही, पण संपूर्ण जग विस्मृत झाले. पण तरीही मी कुठे आहे, कशी आहे, हे सर्व मला माहित होते. मी बेशुद्ध नव्हते आणि थोड्या वेळानंतर ते लुटारु येऊन म्हणाले, ही चावी लागत नाही. दुसरी चावी दे, काढ ती चावी. म्हणून त्या बाईने डोळे