________________
चमत्कार
आहे, ते आवरणाने झाकलेले विज्ञान आहे. बाकी, चमत्कारासारखी गोष्ट नाहीच.
प्रश्नकर्ता : पण हे जे चमत्कार करतात ना, त्यांना तर लोक 'हे ज्ञानीपुरुष आहेत' असे म्हणतात.
दादाश्री : ते तसेच म्हणतील ना, आणि असे जर नाही म्हटले तर त्यांचे चमत्कार चालणार नाहीत. त्यांना जर विचारले, त्यांचे निवेदन घेण्यात आले, की हा चमत्कार कशासाठी करत आहात? कोणत्या हेतुसाठी करत आहात? त्याचे तुम्ही निवेदन करा, असे म्हणावे. मग मजा येईल!
प्रश्नकर्ता : तेव्हा ते लोक असे म्हणतात की श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी.
दादाश्री : जर त्याच्यावर श्रद्धा बसतच नसेल, तर असे खोटे करून श्रद्धा उत्पन्न करवणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारे जो मनुष्य श्रद्धा उत्पन्न करतो, त्याला पकडून शिक्षा केली पाहिजे.
मी पंचवीस वर्षाचा होतो, तेव्हा एका संत आचार्यांकडे गेलो होतो. ते मला म्हणाले, 'माझ्यावर श्रद्धा ठेवा.' मी म्हणालो, 'पण मला श्रद्धा बसत नाही.' तेव्हा म्हणाले, 'पण तुम्ही श्रद्धा बसवण्याचा प्रयत्न करीत राहा.' तेव्हा मी म्हणालो, 'मी तुम्हाला उदाहरण देतो. हे तिकिट आहे, त्यास आपण पाणी चोपडून चिकटविले, पण ते पडून जाते. चिकटत नाही तेव्हा आपल्याला हे नाही का समजणार की काहीतरी कमी पडत आहे या दोघांमध्ये? ज्याच्यावर आपल्याला तिकिट चिकटवायचे आहे ते, आणि हे तिकिट, या दोघांच्यामध्ये कुठली तरी वस्तू कमी पडत आहे, असे आपल्या लक्षात येते की नाही येत? कोणती वस्तू कमी पडत आहे?
प्रश्नकर्ता : डींक कमी पडत आहे.
दादाश्री : हो. म्हणून मी म्हटले, की 'असा काही डीक(गोंद) लावा की माझे तिकिट चिकटेल'. तरीही ते म्हणाले, असे नाही 'तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल.' मी म्हणालो, 'नाही, अशी श्रद्धा मी ठेवणार नाही. मला श्रद्धा बसतच नाही! जर तुम्ही तसे 'देखणे' असते तर