________________
चमत्कार
ज्ञानात तर चमत्कार नसतातच. बुद्धिगम्यमध्ये जे चमत्कार असतात, ते तर कमी बुद्धिवाल्याला जास्त बुद्धिवाला फसवतो. तात्पर्य हेच की चमत्कार नसतात!
प्रश्नकर्ता : म्हणजे दादा, ही काहीतरी बुद्धिपलीकडील वस्तू आहे. तो जरी चमत्कार नसेल, पण बुद्धिच्याही पलीकडील असे काहीतरी आहे ?
दादाश्री : नाही, तेही नाही. हे चमत्कार करतात, ती बुद्धिच्या पलीकडील वस्तू सुद्धा नाही. बुद्धिच्याही पलीकडील अशी फक्त एकच वस्तू आहे, आणि ते 'ज्ञान' आहे. ते तर स्व-पर प्रकाशक ज्ञान आहे आणि ज्ञानात चमत्कार नसतो. जर चमत्कार म्हटले, तर ते बुद्धित गणले जाईल. पण बुद्धित सुद्धा त्यास चमत्कार म्हटले जाणार नाही.
हा तर खुदाई चमत्कार!! ज्ञानात चमत्कार नसतो. मी तर ज्ञानीपुरुष आहे पण आत स्वतः खुदा (भगवंत) प्रकट झालेले आहेत. ते खुदाई चमत्कार दाखवतील की नाही, थोडाफार तरी? खुदाई चमत्कार म्हणजे काय की त्याला शिव्या द्यायच्या असतील तरीही त्याच्याकडून दिल्या जाणार नाहीत. इथे गळ्यापर्यंत शब्द येतात, पण बोलू शकत नाही. असे घडते की नाही? एक मनुष्य इथे आला होता, तो घरुन ठाम ठरवून आला होता की आज तर जाऊन दादांना बोलेनच. तो मला शिव्या देण्यास आला होता. पण इथे येऊन बसला ना, की मग त्याच्या गळ्यातून शब्द निघूच शकले नाहीत. हा कोणता चमत्कार म्हटला जाईल? खुदाई चमत्कार! असे कितीतरी खुदाई चमत्कार 'ज्ञानीपुरुषां'जवळ असतात, ज्याला चमत्कार करायचा नाही तिथे खूप चमत्कार घडत असतात. पण तरी देखील आम्ही त्यास चमत्कार म्हणत नाही.
प्रश्नकर्ता : तरी पण जे अनुभव चमत्कार रूपाने स्वप्नात होत असतात, त्यास काय म्हटले जाईल? माझ्या भयंकर आजारपणात दादांनी स्वप्नात येऊन मला हार घालून विधी केली. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी चमत्कारिक रितीने माझे दुखणे, आजार सर्व निघून गेले आणि नॉर्मल होऊन गेलो. हा अनुभव सत्य असतो का?