________________
54
चमत्कार
हे रहस्य राहीले उलगडल्याशिवाय आणि आपल्या इथे असेही घडते ना की, तुमच्यासारखा सुशिक्षत माणूस, सर्व प्रकारे विचारशील, तोही मला सांगतो की 'काल दुपारी साडे तीन वाजता तुम्ही माझ्या घरी आले होते. आणि साडे चार वाजेपर्यंत माझ्या घरी बसले होते. तुम्ही जो वार्तालाप केला त्याची मी नोंद केली आहे. नंतर तुम्ही निघून गेले, ही गोष्ट खरी आहे का? मी म्हणालो, 'खरी आहे !' मला मग हो म्हणावे लागते, पण मी तर गेलोच नव्हतो. नंतर मी विचारले, 'काय बोलले होते ते मला सांग.' तो मग सांगतो, 'असे बोलले होते.' तो माझेच शब्द दाखवतो.
प्रश्नकर्ता : पण ही तर सूक्ष्म शरीराची गोष्ट आहे ना, ही कुठे स्थूल शरीराची गोष्ट आहे?
दादाश्री : नाही, त्याला हे स्थूल शरीर दिसते. हे तर माझ्याही मानण्यात येत नाही. ह्या अशा काही गोष्टी ऐकण्यात येतात, माझ्या नावाने कोणी देवता फिरत आहे की कोण फिरत आहे, हे समजतच नाही. कारण देवतांचा वैक्रिय स्वभाव, म्हणून जसा देह धारण करायचा असेल तसा धारण होतो. दादांसारखा देह धारण करतो, वार्तालाप पण तसाच करतो, सर्वच करतो. पण तरी मी त्यात काहीही केलेले नसते.
म्हणजे दिवसा ढवळ्या गप्पागोष्टी करतात. आता हे मी जाणत असतो की मी तिथे गेलो नव्हतो. पण 'दादा भगवान' तिथे जातात ही गोष्ट नक्की !
प्रश्नकर्ता : आणि 'ज्ञानीपुरुष' हे जाणत नाही, हे नक्की आहे का?
दादाश्री : मी जाणत नाही, हेही नक्की आणि 'ते' फिरतात हेही नक्की .
आणि तिथे अमेरिकेवाले सांगतात ना, 'आज मला तीन वेळा विधी करवून गेले.' असे मला सांगतात देखील आणि मला त्यांचा फोनही येतो की आज रात्री दादा भगवान' येऊन तीन वेळा त्यांची विधी करवून गेले! म्हणजे हे तर खूप मोठे आश्चर्य आहे! तरीसुद्धा यात नाम मात्रही चमत्कार नाही.