________________
50
चमत्कार
भेटले आहात तर या भटकंतीचा अंत येऊ द्या ना!' तेव्हा मी म्हणालो, 'ठीक आहे मग !' मी हसलो. त्यांनी तर दर्शन करताना माझे पाय गच्च धरुन ठेवले. मी पाठीवर असे केले, धन्य आहे, असे सांगण्यासाठी त्यांची पाठ थोपटली. तर बारा वर्षांपासून त्यांच्या कमरेत जबरदस्त दुखणे होते, ते लगेच दुसऱ्याच दिवशी स्टॉप !
"
म्हणून मग त्यांनी काय केले ? गावभर फिरुन सांगून आले की, 'गेल्या बारा वर्षांपासून माझे जे दुखणे होते, पुष्कळ औषधोपचार केले तरीही दुखणे बरे होत नव्हते पण दादाजींनी एकदाच पाठ थोपटली नी लगेच ते बरे झाले.' मग तर गावात अशी दहा-वीस माणसे होती, की जी दुःखाने कंटाळलेली होती, ती सगळी माझ्याकडे आली! मला म्हणाली, 'आपण त्यांना जे काही केले, तसे आम्हालाही काही करा. तेव्हा मग मी त्या सगळ्यांना समजावले की जेव्हा मला संडास होत नाही तेव्हा मलाच चूर्ण घ्यावे लागते. कधी बद्धकोष्ठता होते तेव्हा मला चूर्ण घ्यावे लागते. त्यावरुन तुम्ही जरा समजा ना ! माझ्याने काही होऊ शकेल असे नाहीच, हे सर्व ! हे तर वारा सुटला आणि कौल सरकले आणि ते पाहून कुत्रा भुंकला, कोणी म्हणाले मी पाहिला चोर, आणि तिथे झाला शोर !' याचे नाव संसार. हे सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे, हा चमत्कार नाही.
लगेच हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी स्पष्टच सांगितले की चूर्ण घेतो तेव्हा मला संडास होते. मला वाटले की आता काहीतरी मार्ग शोधून काढा, नाहीतर ही रोजचीच झंझट सुरु होईल. कोणता व्यापार होता आणि कोणता व्यापार सुरु होईल !
प्रश्नकर्ता : ह्या गोष्टींमध्ये मग आत्म्याचा विसर पडतो ना ?
दादाश्री : हो, आत्म्यास विसरुन जातील आणि हे दुसरे लोक तर आपल्या माणसांना इथे येऊच देणार नाही ना ! ते लोकच सर्व इथे येऊन बसतील आणि हे मिलमालक तर मला इथून उचलून नेतील. हे पैसेवाले लोक तोडफोड सुद्धा करतील, वाटेल ते करतील. माझ्या आसपासच्या माणसांचे ऐकणारही नाहीत आणि कसेही करून मला इथून उठवतील.