Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 17
________________ 6 चमत्कार ही सिद्धी नव्हे प्रश्नकर्ता : पण पुष्कळशा योगींना चमत्कार येत असतात, साधारणपणे लोक पाहू शकत नाहीत, समजू शकत नाहीत, अशा गोष्टी ते लोक करू शकतात. त्यांच्याकडे सिद्धी असते, काही विशेष शक्ति असते, ते काय आहे ? दादाश्री : कुठल्या लोकांमध्ये तुम्ही विशेष शक्ति पाहिली ? आता तर चमत्कारासाठी कोणीतरी बक्षिस ठेवले आहे ना, तिथे तर एकही मनुष्य जात नाही. म्हणजे विशेष शक्ति एकालाही नसते. कुठून आणतील ? असे चमत्कार होतात का ? हे तर फक्त यशनाम कर्म असते की भाऊ, यांच्या नावाने बोलले, म्हणजे तसे घडते. किंवा मग कोणी हृदयाने निर्मळ असेल, तर त्यांच्या बोलण्याप्रमाणे सर्व घडते. अशा हृदयशुद्धीच्या सिद्धी असतात. प्रश्नकर्ता : पण योगविद्येने अशा काही शक्ति प्राप्त होत असतात ना? काही चमत्कार होऊ शकतील अशा सिद्धी प्राप्त करतात ना ? दादाश्री : सिद्धी वगैरे काही प्राप्त होत नाही. चमत्कार होऊ शकतील अशा सिद्धी नसतातच. प्रश्नकर्ता : हे योगी लोक एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून शक्तिपात करतात आणि त्यामुळे त्या व्यक्तिला शांती मिळते, यास सुद्धा सिद्धी म्हणतात ना ? दादाश्री : असे आहे ना, आता बसले जात नसेल, बोलले जात नसेल, पण जर ती औषधीवनस्पति उगाळून पाजली तर काय होईल ? चालता-बोलता होईल, तसेच ह्या मानसिक परमाणुंचे असते. पण त्यात काय फायदा ? असा कोणी मनुष्य जन्माला आला की ज्याने एखाद्या माणसाला मरूच दिले नाही ?! तेव्हा आपण असे समजू की चला आपल्याला तिथे जावेच लागेल. स्वतः च्या आई - बापाला मरू दिले नसेल, त्याच्या भावाला मरू दिले नसेल, असा कोणी जन्माला आला का ? तर मग यात कसल्या सिद्धी

Loading...

Page Navigation
1 ... 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72