________________
चमत्कार
या चोरांना तर अशा-अशा सिद्धी असतात की त्यांनी जर ठरवले की आज मला अमक्या ठिकाणी, अमक्या वेळी चोरी करायची आहे, तर त्या टाईमाला 'एक्झेक्ट' तसे होत असते, तर ही काय कमी सिद्धी म्हटली जाईल? त्यात ते सर्व नियम पाळतात. आणि नियम पाळल्याने सिद्धी उत्पन्न होते.
आपले लोक सिद्धी कशास म्हणतात, ते मी तुम्हाला सांगतो. कोणी शीलवान पुरुष असेल तो अंधारात या बोळात शिरत असेल, संपूर्ण बोळ सापानेच भरलेला असेल, साप तिथे फिरतच असतील आणि तो शीलवान अनवाणी पायांनी बोळात शिरला. अंधार असल्यामुळे त्याला हे कळत नाही की तिथे साप होते की नाही. त्याचे काय कारण असेल ते सांगा? त्याची सिद्धी असेल? आख्या बोळात एका बोटा ऐवढी जागा सुद्धा सापाशिवायची नव्हती. ज्यावेळी तो बोळात गेला तेव्हा तिथे साप होते, पण ते त्याच्या वाटेत येत नाहीत. कारण चुकून जरी साप त्याला शिवला तर साप भाजेल. म्हणून साप एकमेकांवर चढून जातात. अंधारात सुद्धा पुढच्या पुढेच एकमेकांवर चढतात. असा तर त्याचा प्रताप असतो! आता असे जर कधी लोकांनी पाहिले ना, तर ते काय म्हणतील? की ओहोहो! कशी सिद्धी आहे! पण हे तर त्याचे शील आहे. अज्ञानी असेल तरीही शील उत्पन्न होते, परंतु अज्ञानीला संपूर्ण शील उत्पन्न होत नाही, कारण अहंकार आहे ना?
संतांची सिद्धी, संसारार्थ प्रश्नकर्ता : काही संत तर पाऊस पाडत होते. तर ती सिद्धी आहे की नाही?
दादाश्री : हा पाऊस पडण्यासाठी आपले सरकार काहीतरी 'केमिकल' फवारतात ना, त्यामुळे सुद्धा पाऊस पडतो की नाही? पडतो! आणि खरे सिद्धीवाले तर असे पाऊस वगैरे पाडत नाहीत. अशी सिद्धी अज्ञानीला उत्पन्न होते, पण लालचीपणामुळे तो वापरुन टाकतो. ह्या इथे, बडोद्यात पाऊस पडत नव्हता. येथे एक महाराज आले होते. ते म्हणत होते 'मी पाऊस पाडेन.' म्हणजे ही तर एक घडलेली घटना सांगत आहे.