________________
चमत्कार
तर तुम्हाला समजावण्यासाठी आहे की, हे विज्ञान काय आहे ! भगवान महावीरांनी तीन मिनिटे सुद्धा आयुष्य वाढवले नाही. अर्थात् असे काही घडत नाही!
प्रश्नकर्ता : आयुष्याचा, मनुष्याच्या श्वासाबरोबर काही संबंध आहे
का?
दादाश्री : हो, संबंध आहे, हे बरोबर आहे.
प्रश्नकर्ता : यात हे योगी पुरुषांनी श्वासाला थांबवून, श्वासाची गती किंवा त्याचे प्रमाण कमी केले तर त्यांच्या आयुष्यात काही फरक पडतो का?
दादाश्री : हे बरोबर आहे. हे तर स्वाभाविकच आहे. हे आयुष्य वाढविणे याचा अर्थ काय, तर ते श्वासोच्छश्वास वापरु देत नाहीत, श्वासोच्छश्वासावर आयुष्य अवलंबून असते. पण ते त्यासाठी सांगत नाही, तो तर रुबाब दाखवितो. त्यासाठी सांगत असेल तर ठीक आहे! ते तर प्रत्येकाचे होते, त्यात नवीन काय आहे? जेवढे श्वासोच्छश्वास कमी वापरले जातात, तेवढे वर्ष वाढतात. पण हे तर काय म्हणतात? आयुष्य वाढवणे म्हणजे वर्ष वाढवणे असे नाही, पण हे तर श्वासोच्छश्वास वाढवून दिले असा तोरा दाखवितात.
असे आहे, हे तर जगात सगळीकडेच श्वासोच्छश्वास कमी केले म्हणजे आयुष्य वाढते, हा तर नियमच आहे. त्यात ते असे बोलू शकत नाही की, आम्ही आयुष्य वाढविणारे आहोत. असे बोलणे हा तर मोठा अपराध आहे. भगवान महावीर सुद्धा असे बोलू शकत नाही, कोणीही बोलू शकत नाही! जिथे शौचाला जाण्याची शक्ति नाही तिथे आयुष्य कसे वाढविणार होते ते? जगात असा कोणीही जन्माला आला नाही की ज्याला शौचाला जाण्याची शक्ति असेल, याची गॅरन्टी लिहून देतो. आणि काही पण 'मी करत आहे' असे जे पुस्तकात लिहितात, ते सर्व अहंकारी आहेत. 'हे मी केले, मी असे केले आणि मी अमके केले' असे जे सांगतात ना, ते सर्व अहंकारी आहेत. आमच्या पुस्तकात 'मी करत आहे, तू करत आहेस आणि ते करत आहेत' असे कोणत्याही जागी नसते. दुसऱ्या सर्व