________________
22
चमत्कार
असे वाटते की हा चमत्कार केला. पण चमत्कार होणे कसे शक्य आहे? त्याला शौचाला जाण्याची शक्ति नाही, तो कसा काय चमत्कार करणार? वाटेल तो असेल पण त्याच्यात शौचाला जाण्याची शक्ति असेल तर मला सांग की माझ्यात ती शक्ति आहे आणि तीच जर नसेल तर तू चमत्कार कसा करशील?
प्रश्नकर्ता : तर मग जीवनात चमत्काराचे स्थान किती? चमत्कार अंधश्रद्धेकडे घेऊन जातो का?
दादाश्री : ही सगळी अंधश्रद्धा तोच चमत्कार. म्हणजे चमत्कार करतो ना, हे सांगणाराच अंधश्रद्धाळू आहे. स्वतः स्वत:लाच मूर्ख बनवतो तरीही नाही समजत! मी तर इथपर्यंत तुम्हाला शिकवतो की आपण चमत्कार करणाऱ्याला विचारावे की, 'साहेब, तुम्ही कधी शौचाला जाता का?' तेव्हा तो म्हणेल 'हो.' तर आपण त्यांना विचारावे, 'तर ते तुम्ही बंद करू शकता का? किंवा त्याची सत्ता तुमच्या हातात आहे ?' तेव्हा म्हणेल, 'नाही.' मग जर तुमच्यात शौचाला जाण्याचीही शक्ति नाही, तर कशासाठी तुम्ही ह्या लोकांना मूर्ख बनवता? असे म्हणावे.
अर्थात् चमत्काराचे जीवनात स्थान नाही! चमत्कार करण्याची शक्ति मनुष्यात कशी असू शकेल? भगवंतामध्ये ही शक्ति नव्हती. कृष्ण भगवंतांसारखे श्रेष्ठ पुरुष चमत्कारासाठी काही बोलले नाहीत आणि ही सामान्य माणसे विनाकारण बोलत राहतात! हे जास्तीचे बोलण्याचे कारण काय आहे, तर ह्या लोकांनी हिंदुस्तानावर खूप अत्याचार केला आहे! असे व्हायला नको. मला त्या लोकांवर चीड नाही, कोणावरही मला चीड नाही. मनुष्य जे करतो, ते सर्व कर्माधीन आहे. पण तुम्ही त्यास सत्य मानवून घेता? असे का करता? काय फायदा मिळवायचा आहे तुम्हाला? फायदा करून घेण्यासाठीच तुम्ही असे करता ना? ज्याला फायदा करून घ्यायचा नसेल, तो सांगतो का काही? आणि तरीही त्या सिलोनवाल्या वैज्ञानिकाने सांगितले की 'चमत्कार सिद्ध करून द्या, तर मी त्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देईन.' तेव्हा का कोणी लाख रुपये घेण्यासाठी गेले नाही? तेव्हा हे सगळे कुठे गेले होते? कारण तेथे विचारणारे असतात ना, लाख रुपये