________________
चमत्कार
45
दादाश्री : हा चमत्कार नाही, वास्तविकता आहे. जसे मी प्रत्यक्ष भेटलो असेल, त्याचसारखे हे सूक्ष्म स्वरुपात भेटलो. ही वास्तविकता आहे, यात कोणताही चमत्कार नाही.
प्रश्नकर्ता : पण दादा, असे घडले तर सर्वांना चमत्कार वाटणार की नाही ?
दादाश्री : असे तर हजारो ठिकाणी घडत असते. आणि मी जर यास चमत्कार म्हटले तर लोक मला बुवा बनवून टाकतील की तुम्ही तर चमत्कारी बुवा आहात. पण मी बुवा नाही.
कित्येकांना 'दादा' स्वप्नात येतात, गप्पागोष्टी करतात. आता हे काही माझे सांगितलेले नाही. ' धीस इज बट नॅचरल' ज्याची जशी चित्तवृत्ती असेल, कोणी भगवंताला शोधत असेल, तर त्याला तसे सर्व दर्शन होते ! मुसलमानांच्याही स्वप्नात येतात, पण मला ते माहितही नसते.
प्रश्नकर्ता: दादा असे सांगत नाहीत की मी चमत्कार करतो, पण असे चमत्कार होतच असतात ना ?
दादाश्री : हो, होतात ना. जग तर यास चमत्कार म्हणते. पण आपण जर यास चमत्कार म्हटले तर जग जास्त वेडेपणा करेल. हा 'चमत्कार' शब्दच उडवून टाका ! यासाठीच मी हे शोधून काढले की शौचाला जाण्याची तर शक्ति नाही आणि हे काय चमत्कार करणार आहेत ? असे म्हटले तर चमत्कार नावाचे जे भूत लोकांमध्ये घर करून बसले आहे, ते लोक त्यातून बाहेर निघतील !
प्रश्नकर्ता : मग यांना जो अनुभव झाला ते काय आहे ?
दादाश्री : मी सांगितले होते ना की तुमची तयारी पाहिजे. इथे सगळीच तयारी करून ठेवली आहे. जेवढी तुमची 'हार्टची प्योरिटी', जसे तुम्ही बटण दाबाल तेवढे तयार ! म्हणजे फक्त तुम्ही बटण दाबण्याचीच खोटी आहे. बाकी, जग तर यास चमत्कारच म्हणेल. आम्ही हेच सांगू इच्छितो की, यास जर चमत्कार ठरवले तर जगाला हेच हवे आहे. आपल्याकडून, आपली सहमती मागतात की चमत्कार होत असतो की