Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 54
________________ चमत्कार 43 मानणार नाही.' आणि ते समजून गेले की चमत्कारासारखे काही नसते. मनुष्य चमत्कार करू शकत नाही. ___ चमत्कारासारख्या गोष्टींना बुद्धिवंतांनी मानू नये. आणि आपले ज्ञान घेतलेल्या महात्म्यांनी तर हे मानूच नये. कोणी चमत्कारी असेल तर त्याला म्हणावे की, 'तू चमत्कारी असला तरी मला त्याचे काय? म्हणजे यात बुद्धिमान माणसे अडकत नाहीत. दुसरे सगळे तर समजा अडकणारच आहेत. ते तर चार मेंढ्या पुढे चालतील ना, त्यांना पाहून, त्यांचे पाय बघूनच चालतील, तोंड पाहणार नाही. त्याचे पाय कोणत्या बाजूने वळतात त्या बाजूने चालत राहतील. रेघही ओढावी लागणार नाही! सगळे बसून राहतील तेव्हा तोही बसून राहील. सगळे हरे म्हणतील, तेव्हा तोही हरे म्हणेल. कोणी विचारले, तुम्हाला काय समजले? तर तो म्हणेल, 'समजेल कधीतरी!' चमत्कार बुद्धिजन्य आहे, ज्ञानात नाही प्रश्नकर्ता : पण ते लोक तर जगात असेच सांगतात की, हे 'मिरॅकल' (चमत्कार) झाले. जी घटना नेहमी घडत नाही अशी घटना घडली त्यास मिरॅकल म्हणतात, चमत्कार म्हणतात. दादाश्री : असे तर फॉरेनवाले म्हणतात, आपण थोडेच असे म्हणू शकतो? प्रश्नकर्ता : हे तर जे तुमच्याकडे आलेत ते समजतील. बाकी तर हजारामधून नऊशे नव्याण्णव लोकांची भाषा तर तीच ना? दादाश्री : हो तीच भाषा. म्हणूनच म्हणतो ना, आपल्या लोकांना तर खरा आहे की खोटा आहे, त्याची तमा नाही. चमत्कार दाखवला की मग वठणीवर राहतो, अन्यथा राहत नाही. पण मी तर कोणी चमत्कार दाखवला तर समजून जातो की ह्या लोकांनी फसवणूक केली. चमत्कार घडूच कसा शकतो? हे कसे पॉसिबल (शक्य) आहे ? विज्ञान मान्य करेल तरच चमत्कार पॉसिबल आहे! चमत्कार ही बुद्धिगम्य वस्तू नाही आणि

Loading...

Page Navigation
1 ... 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72