________________
चमत्कार
राहतात. हे संतपुरुष सुद्धा खातात पण ते त्यांना पचत नाही बिचाऱ्यांना, उलट जास्त भटकतात! प्रत्येकाचे आपापले यशनाम कर्म असते म्हणून त्यांना यश मिळते. जो थोडा जरी संत झाला असेल, त्याचे थोडेसे यशनाम कर्म असते आणि आमचे यशनाम कर्म मोठे! मला तर संसारी अवस्थेतही यश मिळत होते. असाच, सहजच जरी हाताने स्पर्श केला ना, तरी त्याच्या घरी पैशांचा ढीग होत असे, पण माझ्याच घरी मात्र पैसे येत नसत! आणि मला त्या पैश्यांची गरजही नाही. जेव्हा गरज होती तेव्हा आले नाही आणि आता गरज नाही तेव्हा येण्यास तयार आहे. तेव्हा मी म्हणालो, 'जा, हीराबांकडे, (हीराबा-दादाश्रींची पत्नी) आम्हाला आता काय गरज?'
म्हणजे हे मी केले नाही. हे तर आमचे जे यशनाम कर्म आहे, ते नामकर्मच तुम्हाला सर्व फळ देत आहे. आणि लोकांनी त्यास चमत्कार मानावा, असे शिकवले गेले ! चमत्कार तर होऊच शकत नाही. मी एका बाजूनी असेही सांगतो की वर्ल्डमध्ये कुणालाही शौचाला जाण्याचीही शक्ति नाही, तर मग चमत्कार कसे करू शकतील? ___नंतर पुष्कळ माणसे येऊन सांगतात की, 'दादाजी, मी असा फसलो आहे, तर आपण मला यातून सोडवा ना. म्हणून मी विधी करतो, त्यानंतर त्यांची सुटका होते. म्हणून काय ते मी केले? नाही. मी त्यात निमित्त होतो. हे यशनाम कर्म होते माझे!
एका माणसाने माझ्यासोबत करोडो रुपयांचा सौदा केला. म्हणाला, माझी करोड रुपयांची संपत्ती सर्व फसली आहे आणि आज तर माझ्याजवळ मेन्टेनन्स(जीवननिर्वाह) करण्याइतकेही पैसे नाहीत.' तेव्हा सगळे म्हणाले याला काही विधी करून द्या ना, बिचाऱ्याची काही संपत्ती विकली जाईल. त्याला संपत्ती तीन-तीन वर्षांपासून विकायची होती, पण ती विकली जात नव्हती. म्हणून विधी करून दिली. नंतर महिन्याच्या आत सत्तर लाखांची संपत्ती विकली गेली. मी सांगितले, 'ह्या फॅक्टरीत सत्यनारायणाची पूजा घाला आणि त्या फॅक्टरीत जैनांची पूजा करा.' नंतर तो मला म्हणाला, 'दादाजी तीस लाखांची मिळकत बाकी आहे, काही करा ना!' तेव्हा मी समजून गेलो की ह्या माणसासोबत चुकीचा व्यवहार झाला आहे. या