________________
चमत्कार
दादाश्री : हो अशी खात्री झाली पाहिजे. आपला तर हा मोक्षमार्ग आहे आणि वीतरागींचा मार्ग आहे, चोवीस तीर्थंकरांचा मार्ग आहे! हे तर दुषमकाळातील लोक आहेत, म्हणून कर्मांनी फसलेले आहेत बिचारे. म्हणून तर ते माझ्याजवळ राहू शकत नाहीत. नाहीतर माझ्यापासून दूर सरकणारच नाहीत. असा गारवा (मनः शांती) देतात मग तिथून कोण दूर जाणार? पण कर्मांमुळे सर्व फसलेले आहेत आणि नुसत्या अमर्याद 'फाईली' आहेत. मग काय करतील!!
कळस हालला.... तो चमत्कार? __ प्रश्नकर्ता : कित्येक ठिकाणी लोक दरवर्षी यात्रेला जातात, आता तिथे एका मंदिराचा जो कळस आहे, त्याविषयी सर्व सांगतात की, तो कळस हालताना ती लोकं पाहतात तर ते काय आहे?
दादाश्री : त्यात जास्त खोलवर जाण्यासारखे नाही. ज्याला दिसते, त्याच्यासाठी ते बरोबर आहे. बाकी, आजचे सायन्स हे मान्य करणार नाही. आजचे सायन्स हे मान्य करेल का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : झाले मग! विज्ञान मान्य करेल तेवढीच गोष्ट खरी मानावी. दुसरी सर्व तर अंधश्रद्धा आहे. कित्येक देवी-देवता लोकांची श्रद्धा बसण्यासाठी चमत्कार करतात, तेव्हा असे काही घडते एखाद्या वेळेस. बाकी सर्वकाही सायन्टिफिक असले पाहिजे. हे 'सायन्स' जेवढे मान्य करेल तेवढेच मान्य करण्यासारखे आहे. 'सायन्स' च्या बाहेर काही नाहीच. कित्येक गोष्टी तर अंधश्रद्धाळू लोक गैरसमजुतीमुळे लोकांच्या मनात ठसवतात. जिथे-तिथे सर्वांनी, अज्ञानी प्रजेत श्रद्धा बसवण्यासाठी ही सर्व साधने तयार केली आहेत. हे समंजस लोकांसाठी नाही. ते तुमच्यासाठी नाही. ते सर्व तर दुसऱ्या लोकांसाठी आहे.
तो कळस हलला त्यात आपला काय फायदा? त्यामुळे आपल्याला आत्मा प्राप्त होईल का? म्हणजे हे तर ज्यांना देवावर श्रद्धा बसत नसेल, त्यांना श्रद्धा बसावी तेवढ्या पुरता ते हलवतात, म्हणजे ह्या लोकांची तिथे