________________
चमत्कार
यशही देत नाही. मी त्याला काय सांगतो की, 'हे कोणी दुसऱ्याने केले आहे, म्हणून तिथे जाऊन त्याला द्या.' तरीही म्हणेल, 'नाही, नाही, तुमच्याशिवाय तर हे शक्यच नाही. तुम्ही तर नेहमी असेच बोलता ना!' म्हणजे पुन्हा मलाच यश देऊन जातात. कसेही करून ते गाठोडे ठेवूनच जातात, आता त्याचे काय होईल? मी काय करू मग? यावर काही उपाय तर शोधावा लागेल ना? मग मी समजून गेलो की हे यशनामकर्म आहे.
प्रश्नकर्ता : मग त्या गाठोड्याचे तुम्ही काय करता?
दादाश्री : काही नाही. आम्ही अशी विधी करून त्यास पुन्हा फेकून देतो. कारण आम्ही ते ठेवत नाही, जरी आम्ही केलेले असेल तरीही आम्ही ठेवत नाही ना! कारण की आम्ही कर्ताच नाही, फक्त निमित्त आहोत. काय आहोत? निमित्त. हा हात लावला म्हणून काय, 'मी' हातही नाही आणि पायही नाही, हा तुझ्या कर्माचा उदय आला आहे आणि माझ्या हाताचा स्पर्श झाला. तुझे (दुःख) मिटणार होते आणि माझा हात लागला. कारण की यश मला मिळणार होते की हे दादाने मिटवले. असे सर्व यश मिळते! तेव्हा मला म्हणतात की, 'तुम्ही करतातच ना हे?' मी सांगितले की, हे सर्व यशनाम कर्मच आहे. मी हे उघड केले. जे आत्तापर्यंत लोक उघड करत नव्हते की 'हे माझे यशनाम कर्म आहे,' लोक असे सांगत नाहीत. लोकांना तर तेव्हा चांगली मजा येते, आत जरा टेस्ट (आस्वाद) येत असते. 'तुम्ही माझे मिटवले' असे ऐकतात त्यावेळी त्यांना टेस्ट येते. म्हणून ही टेस्ट सोडत नाही. तेव्हा ही टेस्ट नाही सोडली नाही तर तो मोक्ष चुकतो! इथे रस्त्यातच मुक्काम केला म्हणून तो ध्येय राहूनच जातो ना!
हा तर माझा हात लागला की त्याचे काम होऊनच जाते. म्हणून त्याला असे वाटते की, हे दादांनी केले. दादा काही रिकामे नाहीत, असे सारे करण्यासाठी. दादा तर स्वतः जे सुख चाखत आहेत ते सुख तुम्हाला देण्याकरीता आले आहेत, आणि संसारातून मुक्ती मिळवून देण्यासाठी आले आहेत. स्वतः मुक्त होऊन बसले आहेत. स्वतः संपूर्णप्रकारे मुक्त होऊन बसले आहेत, तेच देतात, दुसरे काही देत नाहीत!