________________
58
चमत्कार
माझ्या आत्म्याला तृप्ती मिळाल्याशिवाय एक क्षणही जात नाही. फक्त एका मोतीला पाहिल्याने डोळे तृप्त होतात, म्हणून तर मोतीची किंमत आखली गेली आहे, तर 'दादा तुम्हाला पाहताच माझा आत्मा तृप्त होतो' अशी ज्याला समज असेल, तो कधी असे दुसरे चमत्कार शोधेल का ?
म्हणून हे भाऊ सांगतात की हे 'दादा, ' तर मोठमोठे चमत्कार करतात. हे जर पाहता आले तर खूप मोठे चमत्कार आहेत. वर्ल्डमध्ये घडले नसतील असे दादांचे चमत्कार आहेत, पण ते पाहता आले पाहिजे. इन्सिडन्ट एन्ड एक्सिडन्ट
प्रश्नकर्ता : सामान्य माणसाला सुद्धा जीवनात कित्येक वेळा चमत्कारिक अनुभव येत असतात, ते काय असेल ?
दादाश्री : जगातील लोक ज्यास चमत्कार म्हणतात, किंवा मग या जगात चमत्कार म्हणजे ' अचानक घडून गेले' असे म्हणतात, म्हणजे त्यास एक्सिडन्ट म्हणतात किंवा चमत्कार म्हणतात. पण एन इन्सिडन्ट हेज सो मेनी कॉजेस एन्ड एन एक्सिडेन्ट हेज टू मेनी कॉजेस !' (एका घटनेच्या मागे कित्येक कारणे असतात आणि एका अपघातामागे बरीच कारणे असतात.) म्हणजे अचानक तर काही घडतच नाही ! घडून गेले ते सर्व पूर्वीचे रिहर्सल झालेले आहे. आधी रिहर्सल झालेले आहे, तीच ही वस्तू आहे. जसे नाटकात आधी रिहर्सल करून मग नाटक करण्यास पाठवतात. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण जगाचे, जीवमात्राचे रिहर्सल पूर्वी होऊनच गेले आहे आणि त्यांनतरच हे सर्व घडत असते. म्हणून मी सांगतो की भीती बाळगण्यासारखी नाही. कारण जे घडणार आहे त्यात फेरबदल होऊ शकत नाही. नाटक सेट (तयार) होऊन गेलेले आहे हे !
प्रश्नकर्ता : मग त्या नाटकाचा डायरेक्टर कोण आहे ?
दादाश्री : हे ऑटोमेटिकलीच होऊन जाते. हा सूर्य नेहमी एकच दिसतो, पण सूर्य तर बदलतच राहतो. (सूर्याच्या बिंबात राहणारे देवता बदलत राहतात) त्यांचे आयुष्य पूर्ण झाले की च्यवन (आत्म्याची दैवी शरीर सोडण्याची क्रिया) होते (बिंब सोडून देतात) आणि दुसरे देवता