________________
चमत्कार
आत प्रवेश करतात. म्हणजे ते आतून बदलतात आणि हे बिंब जसे आहे तसेच राहणार. असे रेग्युलर रुपाने प्रबंधित झाले आहे हे जग. एकदम रेग्युलर मांडणी झालेली आहे. कुणाला काही करावे लागेल असे नाही. जर भगवंत कर्ता झाले असते तर ते बंधनात आले असते.
ह्या जगात दोन गोष्टी नाहीत, त्या दोन गोष्टी दिशाभूल झालेल्या प्रवाहासाठी आहेत. ज्यास लोक म्हणतात ना की, एक्सिडन्ट झाला तर अशी वस्तूच नाही, ते दिशाभूल झालेल्या प्रवाहासाठी आहे. विचारवंतांसाठी एक्सिडन्ट हे नसतेच ना! आणि चमत्कार, यास सुद्धा दिशाभूल झालेला प्रवाहच मानतो, विचारवंत मानत नाही.
एन इन्सिडन्ट हेज सो मेनी कॉजेस एन्ड एन एक्सिडेन्ट हेज टू मेनी कॉजेस!' अशाप्रकारे या चमत्कारात सुद्धा सो मेनी कॉजेस आहेत. कारण की कॉजेस (कारणां) शिवाय कोणतेही कार्य होत नाही, तर मग कॉजेस शिवाय चमत्कार घडले कसे? हे सांगा? त्याचा बेसमेन्ट पाहिजे!
म्हणजे हा चमत्कार आहे, ते जर असेच असेल तर त्याचे कॉज काय? ते सांगा. कॉज शिवाय वस्तू असू शकत नाही आणि जे होऊन राहिले आहे, चमत्कार घडतात तो तर परिणाम आहे. तर त्याचे कॉज सांग तू. म्हणजे हा तर आई-बापाविनाचा मुलगा ठरेल! म्हणून सगळे बुद्धिमान लोक समजून जातील की आई-बापाशिवायचा मुलगा असूच शकत नाही. ह्याने तर आई-बापाशिवायचा मुलगा तयार केला आहे!
प्रश्नकर्ता : म्हणजे हे तर ज्याचे कॉज माहित नसते त्यास चमत्कार म्हणतात
दादाश्री : हो, त्यास चमत्कार म्हणतात, बस! पण पुन्हा हे लोक तसे ठसवतात आणि हे दुसरे लोक लालची आहेत, ते फसतात बिचारे!
संयोगांचे मिलन, तिथे चमत्कार कसे? म्हणजे चमत्कार कशाला म्हणतात? जर कोणाला तुम्हाला सायन्टिफिक रितीने प्रुफ द्यायचे असेल, तर ज्यात कोणत्याही वस्तुची, कोणत्याही संयोगाची गरज पडत नाही, त्यास चमत्कार म्हणतात. आणि