________________
16
चमत्कार
म्हणता येणार नाही ना!' मी म्हणालो, 'तू चमत्कार करतोस, ते आहे तरी काय ? मला ते दाखव तरी' ! तो म्हणाला 'हो, दाखवतो.' नंतर त्याला प्रयोग करण्यास बसवले. त्याने दहा पैशांचे नाणे एका व्यक्तिच्या हातात दिले आणि त्याला मुठ बंद ठेवायला सांगितले. मग त्याने काय केले ? एक आगकाडी पेटवून तिला दूर ठेवून असे असे, दूरुनच हात फिरवून मंत्र बोलू लागला. थोड्यावेळाने ते मुठीतले नाणे गरम होऊ लागले. मग त्याने दुसरी आगकाडी पेटवली. तेवढ्यातच ते नाणे एवढे गरम झाले, की त्या व्यक्तिने मुठीतले नाणे सोडून दिले, हात भाजेल असे होते! मग मी त्याला म्हणालो, ‘दुसरे चमत्कार करायचे असतील ते कर, पण तू मला या चमत्काराचा उलगडा करून दे.' तेव्हा तो म्हणाला, 'त्यात अशा प्रकारच्या वस्तू असतात, केमिकल्स, तर आम्ही ते केमिकल्स नाण्यावर जरासे असे घासून मग त्यांना देतो, त्यावेळी ते बर्फासारखे थंड असते, थोडावेळ झाला म्हणजे ते गरम-गरम होऊ लागते. म्हणजे हे सायन्स आहे, चमत्कार नाही ! एक तर जे आपण जाणत नाही ते हे विज्ञान आहे किंवा दुसरे काही त्यांची हातचालाखी आहे. आणि कोणी असे करतो तेव्हा आपण असे म्हणू शकतो की 'धन्य आहे तुमची हातचालाखी की माझ्या सारख्याला पण तुम्ही गोंधळून टाकतात!' इतके म्हणू शकतो, पण 'तुम्ही चमत्कार करतात' असे म्हणू शकत नाही!
तळलेली भजी कागदाच्या कढईत !!!
मी अठ्ठावीस वर्षाचा होतो तेव्हा माझे आठ-दहा मित्र बसलेले होते, तेव्हा चमत्काराची गोष्ट निघाली. त्यावेळी तर माझ्यात अहंकारी गुण होता ना, म्हणून अहंकार लगेच उफाळत असे. अहंकार प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी म्हणालो, 'काय हे तुम्ही चमत्कार - चमत्कार बोलत आहात ? घ्या, मी करून दाखवतो चमत्कार.' तेव्हा सगळे म्हणाले, 'तुम्ही कोणता चमत्कार करता ?' त्यावर मी म्हणालो, 'हा कागद आहे, या कागदाच्या कढईत मी भजी तळून दाखवू का, बोला!' तेव्हा सगळे म्हणाले, 'अरे, असे कधी होते का ? हे काय वेड्यासारखे बोलताय ?' मी म्हणालो, ‘कागदाची कढई बनवून, त्यात तेल ओतून, स्टोव्ह वर ठेवून भजी तळून देतो आणि तुम्हा सर्वांना एक-एक खाऊ घालतो. ' तेव्हा सगळे