Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 22
________________ चमत्कार शक्ति असणारे महावीर, तर असे महावीर भगवंत काय म्हणाले? 'मी जीवनदाता नाही, मी मोक्षदाता आहे !' आता तिथे जर महावीरांनी ही सिद्धी वापरली असती, तर त्यांचे तीर्थंकरपद गेले असते! ह्या शिष्यांच्या सांगितल्याने जर भगवंत चढले असते तर तीर्थंकरपद निघून गेले असते. पण भगवंत चढले नाहीत. कदाचित माझ्यासारखा चढला असता! खरे तर मी सुद्धा चढीन असा नाही. मी चढूनच तर मार खाल्ला आहे, त्यामुळेच आता सावध झालो आहे. म्हणजे एकदा जर मार लागला असेल तर पुन्हा मार लागू देईल का? म्हणजे भगवंत चमत्कार करीत नाहीत आणि सिद्धी देखील वापरत नाहीत. सिद्धी वापरल्यास, किंमत कवडीची सिद्धी म्हणजे काय हे समजले का तुम्हाला? आता मला करोड, दोन करोड रुपये जमा करायचे असतील तर जमा होऊ शकतील? मी बोलल्याबरोबरच जमा होतील. लोक तर संपूर्ण संपत्ती देण्यास तयार आहेत, त्याचे काय कारण? सिद्धी आहे माझ्याकडे. त्याचा जर मी उपयोग केला तर मग माझ्याकडे काय उरेल? कितीतरी प्रयोग केल्यानंतर ही सिद्धी प्राप्त होते आणि मला पैशांची गरज नाही. पण माझ्या ज्या दुसऱ्या सिद्धी आहेत, आंतरिक सिद्धी आहेत, त्या तर जबरदस्त सिद्धी आहेत. पण भगवान महावीरांनी सिद्धी वापरल्या नाहीत, भगवान कमी पडले नाहीत. तर मी सुद्धा त्यांचाच शिष्य आहे, खूप पक्का शिष्य आहे. मी गोशाला सारखा नाही. खूप पक्का शिष्य, असली शिष्य! एवढा पक्का की, संपूर्ण जग जरी माझे विरोधी झाले तरीही मी घाबरणार नाही एवढा पक्का आहे. मग याहून जास्त आणखी काय पुरावा पाहिजे? सिद्धीचा दुरुपयोग करत नाही म्हणूनच ना? आणि जर सिद्धीचा दुरुपयोग केला तर? लगेचच चार आण्याचे होतील 'दादा'! मग लोक म्हणतील, 'जाऊ द्याना, दादांनी तर आतल्या आत घेणे सुरु केले आहे !' पण मी गॅरन्टी सहित सांगतो की सीक्रेसी सारखी (गोपनीय) वस्तुच नाही. चोवीसही तास, वाटेल तेव्हा तुला पाहायचे असेल तेव्हा तू ये, सीक्रेसीच नाही इथे! आणि जिथे सीक्रेसी

Loading...

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72