Book Title: Chamatkar Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 29
________________ 18 चमत्कार मी तुम्हाला एकदा कागदाच्या कढईत भजी करून दाखवली म्हणजे मग तुम्ही सुद्धा लगेच करू शकाल. तुम्हाला श्रद्धा बसली पाहिजे की हे मंत्र बोलल्याशिवाय होत आहे. मग तुम्ही करू शकाल! म्हणजे असा कोणीही नाही की ज्याला चमत्कार करता येतो. हे तर सारे विज्ञान आहे. विज्ञानाचा स्वभाव आहे, की ज्या कागदात तुम्ही तेल घातले तर कोणत्या स्थितीत कागद जळतो आणि कोणत्या स्थितीत जळत नाही, हे विज्ञान जाणते. खाली स्टोव्ह चालू आहे, वर तेल आहे पण कोणत्या स्थितीत कागद जळत नाही ! हा तर मी स्वतः अनुभव घेतला आहे. प्रश्नकर्ता : कागद जळाला नाही, ते कसे काय ? दादाश्री : त्याची रीत नाही, हा तर कागदाचा स्वभावच असा आहे की जर कागदाखाली थोडे जरी तेल चिकटलेले असते ना, तर कागदाने पेट घेतला असता. प्रश्नकर्ता : पण कागद तर तेल शोषतो ना ? दादाश्री : हो, तेल शोषतो. आत तेल शोषले आहे असे दिसते आपल्याला. त्याचा डाग दिसतो पण तेल गळताना दिसत नाही. आश्चर्य आहे हे एक! आणि हा कागदाचा वैज्ञानिक स्वभाव आहे! पण बुद्धी तर असेच सांगते ना की कागदाला अग्नी जाळतो. आणि तेलवाले कागद असल्यामुळे लवकर पेट घेणार. पण तसे नाही, कागदाच्या खाली जर तेल टपकले असते तर ते जळाले असते. म्हणजे विज्ञानाच्या कित्येक गोष्टींना जाणले पाहिजे. इथे तर त्यांची मती पोहचत नाही, म्हणून यास चमत्कार मानून लोक स्वीकार पण करतात ! ज्यांची मती पोहचत असेल, त्यांना दुसरे विचारही येतात ! हे मोठमोठे आरसे ठेवतात ते धडाम करून फूटतात ! त्यास सर्व लोक चमत्कार केला असे म्हणतात. पण ही तर सारी औषधे आहेत विज्ञानाची !! अर्थात् कोणी देहधारी माणूस चमत्कार करू शकत नाही. किंवा आपण त्या विज्ञानाचे जाणकार नसलो तर तो विज्ञानी मनुष्य आपल्याला

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72