________________
चमत्कार
सर्व करतात. त्यामागे सुद्धा फक्त हा एकच हेतू आहे की, लोकांची श्रद्धा बसावी.
प्रश्नकर्ता : हो, मनुष्य करेल तो चमत्कार म्हटला जाणार नाही. पण मग देवी-देवता करतील तोही चमत्कार म्हटला जाणार नाही?
दादाश्री : जर ते देव चमत्कार करू शकत असतील तर मग इथे मनुष्यात कशासाठी येतील? त्यांना तर अवधिज्ञान सुद्धा आहे ना, जेव्हा त्यांची जाण्याची वेळ येते तेव्हा त्यांची माळ सुकते.... म्हणून त्यांना दुःख वाटते की अरेरे! हे तर आता तेलीच्या घरी माझा जन्म आहे! तुम्ही जर चमत्कार करणारे आहात, मग इथे कशासाठी जन्म घेता? तिथेच बसून राहा ना!
___ फक्त तीर्थंकरच असे आहेत की, ते अशक्य गोष्ट करू शकतात, जे दुसऱ्यांना शक्य नाही. त्यांच्यात तेवढे सामर्थ्य आहे. पण असे केले तर त्यांचे तीर्थंकरपद निघून जाते; लगेच गमवून बसतील!
प्रश्नकर्ता : तर या दोन वस्तू वेगळ्या झाल्या. जी हातचालाखी म्हणतात, जादुगिरी म्हणतात, त्यास चालाखी म्हटले, आणि ही तांदूळाची वृष्टी झाली, ती तर देवांची कृपा आहे.
दादाश्री : हो, त्यास कोण नाही म्हणत आहे? ती तर आहेच ना! पण त्यास आपण चमत्कार म्हणत नाही. ही तर देवांची कृपा दिसून येते. पण आपल्या लोकांना ही जी चमत्कार शब्द बोलण्याची सवय आहे, ती आम्ही मोडू इच्छितो!
मूर्तिमधून अमृतवर्षा.... प्रश्नकर्ता : आता कित्येक ठिकाणी मूर्तिंची प्राण प्रतिष्ठा करतात, त्यावेळी अमृतवर्षा होते, तर ही काय वस्तू आहे ?
दादाश्री : ज्यांची प्रतिष्ठा करतात ना, त्यांचे शासनदेव असतात, ते शासनदेव त्यांचे माहात्म्य वाढवण्यासाठी सर्व उपाय करतात. जेवढी मते आहेत, तेवढे त्यांचे शासनदेव असतात. ते शासनदेव आपापल्या धर्मांचे रक्षण करतात.