________________
चमत्कार
कुणाचे किंचितमात्रही सुख हिरावून घेण्याची ज्याची इच्छा नाही, तिथे ज्ञान प्रकट होते. कोणत्याही प्रकारची भीक नाही, मान-तानाची भीक नाही, अपमान केला तरीही हरकत नाही, मान दिला तरी हरकत नाही, विषयविकार संबंधी भीक नाही, तिथे ज्ञान प्रकट होते. आणि हे लोक म्हणतात, 'आम्ही ज्ञान घेऊन फिरत' आहोत. पण तुझ्यात तर सर्व प्रकारची भीक आहे मग तिथे ज्ञान कसे असेल?! आणि हे असे तर ह्या दिशाभूल झालेल्या प्रवाहात चालेल. या इथे बुद्धिवंतांजवळ असे नसावे!
पण आपल्या इथे बुद्धिवंत कसे आहेत? कच्चे आहेत, तुमच्या सारखे नाहीत. 'असो, आपल्याला त्याचे काय? असे बोलतात ते. म्हणून तर त्या लोकांना बुद्धिवंत लोकांचे रक्षण मिळाले. परंतु जर बुद्धिवंतांनी त्यांचे रक्षण केले नाही, तर ते लगेच सरळ होतील. हिंदुस्तानातील लोक, 'आपल्याला काय?' असेच बोलतात! मला तर 'आपल्याला काय?' हे चालतच नाही, सहन होत नाही. स्पष्टपणे सांगा ना, दोन जन्म जास्त झाले तरी चालेल! पण आपले बुद्धिवंत लोक सुद्धा चमत्काराला मानू लागले. अरेरे! असे का झालेत लोक! चांगल्या विचारवंत माणसांमध्ये सुद्धा असे ठाम बसले आहे की या चमत्कारासारखे काहीतरी नक्कीच आहे. हा जो दिशाभूल झालेला प्रवाह त्याला मानतो, त्यावर विश्वास ठेवतो, त्याची आपल्याला हरकत नाही, पण विचारवंत माणसं देखील त्यास मानतात, म्हणून असे समजावे की आपल्या हिंदुस्तानाची जी बुद्धिशक्ति आहे, ती फॅक्चर होऊ लागली आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे लोकांच्या भाषेत त्यास चमत्कार म्हटला जातो?
दादाश्री : ते दिशाभूल झालेल्या प्रवाहात, बुद्धिवंतांच्या भाषेत नाही. आणि बुद्धिवंत माझ्याकडे येत असत, ते सांगत होते की, 'हा चमत्कार!' तेव्हा मी सांगितले, 'तुमच्यासारखे बुद्धिवंत लोक असे मानतात?' तेव्हा ते म्हणाले, 'आम्हाला मनात तर खूप काही होत असते पण आमच्या डोक्यात हे सतत घातल्याने मग आम्हालाही ते खरेच वाटते. नंतर मी त्यांना सगळ्या त-हेने समजावले, म्हणून त्यांना एक्सेप्ट झाले. नंतर म्हणाले, 'आता आम्ही