________________
चमत्कार
तर त्याला बुद्धिवंत म्हणूच शकत नाही. बुद्धिवंतांना लालूच नसते, आणि लालूच असेल तर बुद्धी नाही!
ते प्रकट करते धर्मभावना आणि कित्येक संत म्हणतात, 'अरे, असे होऊन गेले, निरंतर अंगारा पडत राहतो.' अरे पण मला अंगायचे काय काम आहे? मला श्रद्धा बसेल असे काही बोला. अशी अंगाऱ्याची श्रद्धा किती दिवस टिकेल? तू असे काही बोल की ज्यामुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही! पण बोलण्याची शक्ति उरली नाही म्हणून तर राख पाडावी लागली!
चमत्कार करून भस्म काढतात, आणि अमके काढतात. आता हे जे करतात, ती त्यांची एक प्रकारची साधना आहे! आणि त्याने लोकांना धर्माच्या मार्गावर वळवतात. म्हणून मी लोकांना सांगितले होते की, 'भाऊ, ते चांगले आहे. असे असेल तर त्याचे खंडन करू नका. कारण ज्या लोकांना धर्माची काहीच समज नाही, त्या लोकांना धर्माच्या मार्गावर आणतात, धर्मासाठी प्रेरित करतात आणि फिट(लायक) बनवतात, तर ते चांगलेच आहे !' म्हणजे तिथे जाणारे परत माझ्याकडे येतात, मला भेटतात तेव्हा मी सांगतो, तिथे जा. कारण की ते तुम्हाला प्रगती पथावर नेतील. त्यांच्यात एवढी शक्ति आहे की ते तुमची श्रद्धा जिंकून घेतात. ते तुम्हाला असे नाही सांगत की माझ्यावर श्रद्धा ठेवा. ते तर चमत्कार करून लगेच तुमची श्रद्धा बसवतात. पण ते, 'लो स्टॅन्डर्ड' करिता आहे, 'हायर स्टॅन्डर्ड' च्या माणसांसाठी ते नाही. 'हायर स्टॅन्डर्ड' वाल्यांची बुद्धी विकसित झालेली असते, म्हणून तिथे जाऊ नका. बुद्धी विकसित नसेल तर तिथे जावे. म्हणजे प्रत्येक प्रकारची माणसं असतात. 'स्टॅन्डर्ड' तर प्रत्येक प्रकारचे असते ना? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : ते भक्त मग पुढच्या जन्मात ज्ञानी होणार आहेत का?
दादाश्री : अजून तर पुष्कळ जन्म होतील, तोपर्यंत असेच्या असेच चालू राहील. त्यानंतर विकसित बुद्धिच्या विभागात येतात आणि विकसित झालेल्या बुद्धिच्या विभागात तर कित्येक जन्म होतात, तेव्हा ते हळूहळू ज्ञानाच्या मार्गावर येतात!